Rajendra Raut News : सरकारला ‘पै न्‌ पै’चा हिशेब देऊ; पण माझ्याशी वाईट वागणाऱ्यांना धडा शिकवू : राऊतांचा इशारा

मुंबई उच्च न्यायालयाने आमदार राऊत यांच्या संपत्तीची चौकशी करून तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
Rajendra Raut
Rajendra RautSarkarnama
Published on
Updated on

बार्शी (जि. सोलापूर) : मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) संपत्तीबाबत तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आमच्याकडे वडिलोपार्जित जमिनी, जागा आहेत. आमचा प्लॉटिंगचा व्यवसाय आहे. सध्या जमिनीचे दर वाढले आहेत, त्यामुळे आमची संपत्ती वाढली आहे; पण कर्जही तेवढ्याच प्रमाणात घेतलेले आहे, असे भाजप समर्थक अपक्ष आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी सांगितले. (We will give an account of all our wealth to the government : Rajendra Raut)

निवृत्त पोलिस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर यांनी ईडी, सीबीआय, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, इन्कम टॅक्स या ठिकाणी आमदार राजेंद्र राऊत यांच्या संपत्तीबाबत तक्रार दिली होती. त्याची चौकशी होण्यास विलंब होतो आहे, त्याची तातडीने चौकशी करावी, यासाठी आंधळकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने आमदार राऊत यांच्या संपत्तीची चौकशी करून तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्याबाबत आमदार राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

Rajendra Raut
NCP News : ‘दशरथ माने चेअरमन होतील; म्हणूनच भरणेंनी ‘कर्मयोगी’ची निवडणूक सोडून दिली’ : राष्ट्रवादीच्या माजी नेत्याचा गौप्यस्फोट

राऊत म्हणाले की, आमच्या कुटुंबातील सर्वजण वर्षाला प्राप्तीकर, जीएसटी, अशा स्वरूपाच्या करापोटी सरकारला चार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम भरुन नियमांचे तंतोतंत पालन करतो. याबाबतची सर्व कागदपत्रे सरकारकडे आहेत. प्रशासनाचे काम आहे, त्यांनी मागितले तर सर्व कागदपत्रे देण्यास आम्ही तयार आहोत, त्याबाबतची दक्षता आम्ही घेतली आहे. सरकारला ‘पै ना पै’ चा हिशेब देऊ, असे आमदार राजेंद्र राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले.

Rajendra Raut
Indapur Politics : पवार निष्ठावंतांवर इंदापुरात अन्याय; भरणे गट म्हणजे कमिशन गोळा करणारी टोळी : महारुद्र पाटलांचा आरोप

आमदार राऊत म्हणाले की, माझ्यासह माझी पत्नी, भाऊ, भावजय, मुले यांचे नावाने विविध संस्था, उद्योग उभारले असून त्यासाठी कोट्यवधी रुपयांचे कर्ज काढले आहे. वेळेवर बँकांचे हप्ते भरतो, व्याज भरतो. आम्ही कधी बॅंकांना बुडवले नाही किंवा विजेचे बिल थकवले नाही. शेतीसाठीही कर्ज घेतले आहे. रात्रीचा दिवस करून आमचे कुटुंबीय व्यवसाय उद्योगात कष्ट करत आहे, त्यामुळे विरोधकांसारखे लबाड बोलण्याचा प्रश्नच नाही.

Rajendra Raut
Aurangabad Teachers Constituency : राणा पाटलांची यशस्वी शिष्टाई : क्षीरसागरांची ताकद भाजपच्या किरण पाटलांच्या पाठीशी

बार्शी तालुक्याचा लोकप्रतिनिधी असल्यामुळे विकासाचा गाडा सुरु असताना विरोधककांकडे पाहण्यासाठी, त्यांच्या कुरघोड्यांकडे लक्ष देणे जमत नव्हते. पण, आता दिवसांतील दोन तास किंवा आठवड्यातील दोन दिवस यांच्यासाठी आगामी काळात देणार आहे. माझ्यासोबत विनाकारण वाईट वागणाऱ्यांना धडा शिकवावा लागेल, असा इशारा आमदार राजेंद्र राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com