'ZP अध्यक्ष असताना जेवढं काम केलं, तेवढं चांगलं काम मंत्री असूनही करू शकलो नाही!'

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या माध्यमातून गोरगरिबांचे समाधान करता येते.
Dattatray Bharane
Dattatray BharaneSarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharane) यांनी सोलापुरात (Solapur) मोठे विधान केले आहे. जिल्हा परिषदेचा (झेडपी Zp) अध्यक्ष असताना जेवढे चांगले काम केले, तेवढे चांगले काम मी आजही (राज्यमंत्री असूनही) करू शकलो नाही, असे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी म्हटले आहे. (When i was ZP president, did better than post of Minister of State : Dattatray Bharane)

सोलापूर जिल्हा परिषद स्थापनेच्या हीरक महोत्सवाच्या कार्यक्रमात पालकमंत्री दत्तात्रेय भरणे बोलत होते. भरणे हे इंदापूरचे आमदार होण्यापूर्वी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्या कामाचा जोरावरच त्यांनी इंदापूरची आमदारकीची निवडणूक जिंकली आहे, त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपद आणि दत्तात्रेय भरणे यांची पुणे जिल्ह्यात कायम चर्चा असते. त्यानंतर जिल्ह्यातील अनेकांनी तोच कित्ता गिरवण्याचा प्रयत्न केला आहे.

Dattatray Bharane
पोलिस दलात मोठी खांदेपालट : नम्रता पाटील, मिलिंद मोहितेंसह ७८ अधिकाऱ्यांच्या लवकरच बदल्या

पालकमंत्री भरणे म्हणाले की, जिल्हा परिषदेचे (झेडपी) आणि माझे नाते वेगळे आहे. मी इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा अध्यक्ष होतो. आज मी मंत्री आहे आणि मागे आमदारही होतो. मात्र, मी प्रामाणिकपणे सांगतो की, झेडपीचा अध्यक्ष असताना जेवढे काम केले, तेवढे चांगले काम मी आजही (मंत्री असूनही) करू शकलेलो नाही.

Dattatray Bharane
काय थट्टा चालवली काय? : राज ठाकरेंची वाढीव सुरक्षा पाहून मनसे नेते संतापले

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या माध्यमातून गोरगरिबांचे समाधान करता येते. झेडपीच्या अध्यक्षांनी जर काम केले, तर रात्री खूप चांगली झोप येते. मात्र, मंत्रालयात असतानाही तेवढी चांगली झोप येत नाही, असे सांगून आपण आपल्या राज्यमंत्रीपदाच्या कामावर खूष नसल्याचे अप्रत्यक्षपणे दत्तात्रेय भरणे यांनी सांगून टाकले आहे.

Dattatray Bharane
सोलापूरकरांनो, गैरसमज करून घेऊ नका; ‘ती’ योजना जुनीच : भरणे

यंदाची आषाढी वारी कोरोना नियम बंधनमुक्त असणार

आषाढी वारी नियोजनाच्या बैठकीत पालकमंत्री भरणे म्हणाले, यंदाची वारी ही कोरोनाच्या नियमाच्या बंधनातून मुक्त होणार आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपेक्षा जास्त वारकरी या वर्षी आषाढी वारीसाठी येणार आहेत. त्या दृष्टीने प्रशासनाने सर्व तयारी करावी, अशी सूचना करण्यात आली आहे. दरवेळी १० ते १२ लाख वारकरी पंढरपुरात येत असतात. यंदा १५ लाख वारकरी येऊ शकतील, या अंदाजाने नियोजन करण्यात येत आहे. आषाढी वारीच्या दृष्टीने प्रशासनाची तयारी सुरु आहे. वारकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन उपाय योजना केल्या जात आहेत, अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com