Anna Hazare News Updates
Anna Hazare News UpdatesSarkarnama

असे निर्णय घेऊन राज्य सरकार कुठे घेऊन जाणार आहे?

वाईन विक्रीच्या या निर्णयावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ( Anna Hazare ) यांनीही आज टीका केली. अण्णा हजारे यांनी त्यांच्या राळेगणसिद्धी या गावात दारू व गुटखा बंदी करून दाखविली होती.
Published on

राळेगणसिद्धी ( जि. अहमदनगर ) - महाराष्ट्र सरकारने राज्यातील किरणा दुकाने व सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिली आहे. त्यामुळे भाजप व महाविकास आघाडीच्या नेत्यांत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकरांनीही वाईन विक्रीच्या निर्णयावर उपरोधिक टीका केली होती. वाईन विक्रीच्या या निर्णयावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ( Anna Hazare ) यांनीही आज टीका केली. अण्णा हजारे यांनी त्यांच्या राळेगणसिद्धी या गावात दारू व गुटखा बंदी करून दाखविली होती. ( Anna Hazare News Updates )

अण्णा हजारे म्हणाले, महाराष्ट्र सरकारने नुकताच सुपर मार्केट आणि किराणा दुकानातून वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय महाराष्ट्रातील जनतेसाठी अतिशय दुर्दैवी आहे. असे निर्णय घेऊन राज्य सरकार राज्याला कुठे घेऊन जाणार आहे, असा प्रश्नही हजारे यांनी उपस्थित केला.

Anna Hazare News Updates
अण्णा हजारे यांनी अमित शहांना पत्र काय लिहिले आणि दोन मित्रांतच वाद पेटला...

ते पुढे म्हणाले की, वास्तविक पाहता संविधानानुसार लोकांना व्यसनांपासून, अंमली पदार्थांपासून, मद्यापासून परावृत्त करणे, तसा प्रचार-प्रसार आणि लोकशिक्षण-लोकजागृती करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. असे असताना केवळ आर्थिक फायद्यासाठी मद्यपान आणि व्यसनाधीनतेला मोकळे रान करून देणारे निर्णय घेण्यात येत असल्याचे पाहून दुःख होते.

20 नोव्हेंबर 2021 रोजी घेतलेल्या आणखी एका निर्णयात याच सरकारने आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क 300 टक्क्यांवरून 150 टक्के केलेले आहे. उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात करून हे मद्य स्वस्त करण्यात आले. यातून 2.5 लाख बाटल्यांची विक्री वाढेल आणि सरकारला मिळणारा महसूल 100 कोटीवरून 250 कोटीवर जाईल असा विचार सरकारने केला असल्याचे समजते. याचाच अर्थ लोक व्यसनाधीन होऊन बरबाद झाले तरी चालतील पण सरकारचा महसूल वाढला पाहिजे असा अट्टाहास दिसून येतो असे हजारे यांनी म्हटले आहे.

Anna Hazare News Updates
अजित पवार आले म्हणून अण्णा हजारे कार्यक्रमाला गेलेच नाहीत...

सरकारने घेतलेल्या वाईन विक्रीच्या निर्णयाचा राज्यातील जनता निषेध करीत आहे तर सरकारमधील लोक मात्र या निर्णयाचे समर्थन करीत आहेत. केवळ महसूल मिळतो म्हणून अशा प्रकारे मद्य विक्रीला रान मोकळे करून देणे हे राज्यातील जनतेसाठी दुर्दैवी आहे. शेतकऱ्यांचेच हित पहायचे असेल तर गोरगरीब, सामान्य शेतकरी आपल्या शेतात जे धान्य पिकवतो त्याला राज्य आणि केंद्र सरकारने योग्य हमी भाव द्यायला हवा. पण त्याकडे शासन दुर्लक्ष करून एका वर्षात 1 हजार कोटी लिटर वाईन विक्रीचे उद्दीष्ट ठेवणारे सरकार यातून नेमके काय साध्य करणार हा खरा प्रश्न आहे.

- अण्णा हजारे, जेष्ठ समाजसेवक

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com