Sahyadri Sugar Factory Election : शिवेंद्रराजेंच्या भूमिकेचा फायदा कुणाला?; म्हणाले, ‘कोणी कोणाच्या सहकारी संस्थेत लक्ष न घालण्याची साताऱ्यात प्रथा’

ShivendraRaje Bhosale Role : कोणी कोणाच्या सहकारी संस्थेत लक्ष घालायचे नाही, अशी प्रथा पूर्वीपासून सातारा जिल्ह्यात आहे. ही प्रथा सर्व नेत्यांनी आतापर्यंत पाळली आहे.
Balasaheb Patil-Shivendraraje Bhosale
Balasaheb Patil-Shivendraraje BhosaleSarkarnama
Published on
Updated on

Satara, 18 March : कऱ्हाड येथील सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीत माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यापुढे भाजपचे आमदार मनोज घोरपडे यांनी मोठे आव्हान निर्माण केले आहे. त्यांना खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेतेमंडळींचा पाठिंबा आहे. याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कलही घोरपडेंच्या पॅनेलकडे असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत सभासद हे हिताचाच निर्णय घेतील, अशी भूमिका घेतली आहे, त्यामुळे शिवेंद्रसिंहराजेंच्या भूमिकेचा फायदा कुणाला होणार, अशी चर्चा साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

कराडमधील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रणधुमाळी सध्या सुरू आहे. विधानसभेतील पराभावानंतर माजी मंत्री पाटील यांची सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अनेक वर्षे ताब्यात असलेला सह्याद्रीच्या निवडणुकीत पाटील यांच्यासमोर प्रथमच कडवे आव्हान उभे राहिले आहे, त्यामुळे बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil ) यांनीही ताकद पणाला लावली आहे.

कराडच्या दौऱ्यावर आलेले शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात (Sahyadri Sugar Factory Election) विचारले असता त्यांनी वरील भूमिका मांडली. ते म्हणाले, कोणी कोणाच्या सहकारी संस्थेत लक्ष घालायचे नाही, अशी प्रथा पूर्वीपासून सातारा जिल्ह्यात आहे. ही प्रथा सर्व नेत्यांनी आतापर्यंत पाळली आहे, त्यामुळे सभासद हे हिताचाच निर्णय घेतील, असे सांगून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत लक्ष न घालण्याची भूमिका घेतली आहे, त्यांच्या या भूमिकेचा फायदा नेमका कोणाला होणार, याची चर्चा साताऱ्यात रंगली आहे.

Balasaheb Patil-Shivendraraje Bhosale
Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा झटका; जामीन अर्ज फेटाळला, पोलिस लवकरच मुसक्या आवळणार

सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत तुमची भूमिका काय आहे, असे विचारले असता शिवेंद्रराजे म्हणाले की आमचाही अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना आहे. आमच्याही कारखान्याच्या निवडणुका दर पाच वर्षांनी होत असतात, त्यामुळे असे कधी कोणी एकमेकांच्या कारखान्यात, संस्थेत आतापर्यंत कोणीही लक्ष घातलेले नाही.

Balasaheb Patil-Shivendraraje Bhosale
Sanjeevraje : श्रीराम कारखाना सुरू करण्यासाठी शिवरुपराजेंनी रुपयाही दिला नाही; फलटणची राष्ट्रवादी भाजपची बी टीम आहे का? : संजीवराजेंचा पलटवार

सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे सभासद जो हिताचा निर्णय असेल तोच घेतील. शेवटी सभासदांच्या हातात सर्व काही असते. तुम्ही किंवा मी सांगून काही होत नाही, सभासदच कारखान्याबाबत काय असेल तो निर्णय घेतील, असेही शिवेंद्रराजे भोसलेंनी स्पष्ट केले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com