Dhebewadi News : आम्ही डोंगर फोडून केलेल्या विकास कामावर विरोधकांकडून फक्त दुरुस्तीच्या मलमपट्ट्या सुरू आहेत. आम्ही बांधलेल्या धरणातील गाळही त्यांना निघालेला नाही. माझ्या कारकिर्दीत मंजुरी मिळालेला ढेबेवाडी खोरे पाटणशी जोडणारा महिंद - नाटोशी रस्ता का रखडला. जनतेच्या सोयीचा हा मार्ग का होत नाही ? असा सवाल माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर (VIkaramsinh Patankar) यांनी उपस्थित केला. अन्याय व दबाव सहन न करता या जिव्हाळ्याच्या प्रश्र्नी आवाज उठविण्याचे आवाहनही त्यांनी केले.
माजी मंत्री पाटणकर यांनी ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांचे नेतृत्व मानणारे विभागातील विविध गावे आणि वाड्या वस्त्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. या निमित्ताने गेल्या चार दशकातील अनेक प्रसंग आणि आठवणींना उजाळा मिळाला.
श्री. पाटणकर म्हणाले,' त्या काळात संघर्षातून माझे नेतृत्व उभे राहिले. नेत्याने डोळ्यासमोर ठेवलेल्या सर्वसामान्य जनतेच्या विकासाच्या ध्येयाला भक्कम साथ देणारे तळमळीचे कार्यकर्ते व सहकारी सोबत होते. निवडणूक काळात घरातून भाजी भाकरी बांधून घेवून कार्यकर्ते नेत्यांसोबत बाहेर पडायचे. दिवस दिवस पायपीट करायची. प्रत्येकाच्या डोळ्यात विश्वास आणि तालुक्याच्या विकासाची भूक होती. ज्या विश्वासाने मला जनतेने तालुक्याच्या नेतृत्वाची संधी दिली त्याची मी तालुक्याच्या चौफेर विकासातून पोच दिली.
डोंगर फोडून गावे व वाड्या वस्त्या रस्त्याने जोडल्या. रस्ते,आरोग्य,शिक्षण,पाणी योजना आदी मूलभूत सुविधा पुरविल्या. छोटी मोठी धरणे व जलसंधारणाच्या कामातून शेती आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. हे वास्तव आणि संघर्षाचे तुम्ही ज्येष्ठ मंडळी साक्षीदार आहात, त्यामळे नव्या पिढीला त्याबाबत जागरुक करा. भौगोलिक अडचणीतून तालुक्याला बाहेर काढून विकास पर्व उभे केल्याचे मोठे समाधान मला आहे.
मात्र सध्या तालुक्यात काय सुरू आहे? आम्ही डोंगर फोडून केलेल्या विकास कामावर विरोधकांकडून फक्त दुरुस्तीच्या मलमपट्ट्या सुरू आहेत.आम्ही बांधलेल्या धरणातील गाळही त्यांना निघालेला नाही. ढेबेवाडी खोरे पाटणला जोडणारा महिंद - नाटोशी हा कमी अंतराचा मार्ग अस्तित्वात येण्यासाठी मी माझ्या मंत्रिपदाच्या कारकीर्दीत मंजुरी घेवून निधीची उपलब्धता केली परंतु पुढे त्याचे काय झाले हे वास्तव आता तुमच्या समोरच आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.