Ram Shinde : ‘मी लढलो कोणाशी...? बारामतीवाल्यांशी; घरात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संरक्षण, कृषिमंत्री तरीही त्यांची किंमत माझ्यापेक्षा 622 मतांनी जास्त’

Assembly Election 2024 : दोन पराभवानंतरही मी डगमगलो नाही. पहिल्यांदा हरलो, तेव्हा विधान परिषद सदस्य झालो. दुसऱ्यांदा हरलो तेव्हा मतदानाला एक दिवस कमी असताना मी विधान परिषदेचा सभापती झालो. मतं अशीतशी पडली नाहीत.
Ram Shinde
Ram ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 31 March : घरात चार वेळा मुख्यमंत्री, पाच वेळा उपमुख्यमंत्री, देशाचे संरक्षण मंत्री, कृषिमंत्री, लोकसभेतील विरोधी पक्षनेते, विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि पक्ष फुटला तरी घरात तीन खासदार....त्यांच्याबरोबर माझी लढत आणि माझ्या किमतीपेक्षा त्यांची किमत ६२२ मतांनी जास्त आहे. येत्या 2029 ला 622 चं मार्जिन कव्हर करायचं आहे. त्यांचा राजकारणाचा इतिहास 60 वर्षांचा आहे, आपलं काय, असे सांगून विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत केवळ ६२२ मतांनी झालेल्या पराभवाबाबत खंत व्यक्त केली.

विधान परिषदेच्या सभापतिपदी निवड झाल्याबद्दल सोलापूर येथे धनगर समाजाच्या वतीने प्रा. राम शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाला आमदार विजयकुमार देशमुख, माजी आमदार रामहारी रुपनवर, चेतन नरोटे, नरेंद्र काळे, विश्वास देवकाते आदी उपस्थित होते.

सभापती शिंदे म्हणाले, विधानसभेच्या 2009 आणि 2014 या दोन्ही निवडणुकांमध्ये मी मोठ्या फरकाने निवडून आलो. मात्र, 2019 ला बारामतीकरांची वक्रदृष्टी माझ्यावर पडली. आमच्या मतदारसंघात आमच्या विरोधात उभा राहायला माणूस नाही. बाहेरून पार्सल आले आणि आम्ही दोन वेळा पडलो. आता तर हातघाईला आलेला कार्यक्रम, केवळ ६२२ मतांनी पडलो. हातातोंडाशी आलेला घास हिरवला गेला.

दोन पराभवानंतरही मी डगमगलो नाही. पहिल्यांदा हरलो, तेव्हा विधान परिषद सदस्य झालो. दुसऱ्यांदा हरलो तेव्हा मतदानाला एक दिवस कमी असताना मी विधान परिषदेचा सभापती झालो. मतं अशीतशी पडली नाहीत. एक लाख २६ हजार ४३३ मते घेतली. हे मतदान एवढं घेतलं की पराभूत झालेल्या उमेदवारांमध्ये चौथ्या क्रमांकाचे आहे. एवढ्या कमी फरकाने पडलो की राज्यात सहावा आहे. दोन्ही यादीत राम शिंदे यांचेच नाव आहे, असा दावाही राम शिंदे यांनी केला.

Ram Shinde
Vijaykumar Deshmukh : देशमुखांची खदखद अखेर बाहेर; 'भाजप सरकारमध्ये सोलापूरला मंत्री बघणं अवघड; भाजपचे मंत्री सोलापूरकडे दुर्लक्ष करतात’

राम शिंदे म्हणाले, राज्यात जे २८८ आमदार निवडून आले, त्यातील १९७ आमदारांपेक्षा जास्त मतदान आहे. मी काय गोट्या खेळलो काय. मी लढलो कोणाबरोबर. मी बारामतीवाल्या बरोबर लढलोय आणि 622 मतांनी पडलो, त्यामुळे राम शिंदेंची काय औकात आहे. आमचा इतिहास काय आहे. आमच्या वडिलांचा काय इतिहास आहे. चुलता, पुतण्या, काकू, नातू असं कोणी नाही. राम शिंदे एकटाच लढला.

Ram Shinde
Walmik Karad : वाल्मीक कराडचा आणखी एक कारनामा उघड; फिल्म प्रोडूसरचे कार्ड सापडलं, खंडणीचा पैसा चित्रपटसृष्टीत गुंतवला?

समोरच्या गड्याचा काय इतिहास आहे? घरात चार वेळा मुख्यमंत्री, पाच वेळा उपमुख्यमंत्री, देशाचे संरक्षण मंत्री, कृषिमंत्री, लोकसभेचे विरोधी पक्षनेते, राज्यात विरोधी पक्षनेते आणि पक्ष फुटला तरी घरात तीन खासदार, त्यांच्याबरोबर माझी लढत आणि माझ्या किमतीपेक्षा त्यांची किमत केवळ ६२२ मतांनी जास्त आहे, असेही राम शिंदे यांनी स्पष्ट केले.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com