Walmik Karad : वाल्मीक कराडचा आणखी एक कारनामा उघड; फिल्म प्रोडूसरचे कार्ड सापडलं, खंडणीचा पैसा चित्रपटसृष्टीत गुंतवला?

Santosh Deshmukh Murder Case : माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे बीडमधील सर्व कार्यक्रमाचे नियोजन हा वाल्मीक कराड करायचा. मुंडे यांचा दौरा, पक्षाच्या प्रमुख नेतेमंडळींच्या दौऱ्यांचा इव्हेंट वाटावा, एवढं भपकेबाज नियोजन हा वाल्मीक कराड करायचा.
Walmik Karad
Walmik KaradSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 31 March : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. मात्र या प्रकरणातील कृष्णा आंधळे अजूनही फरारी आहे. वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यावर देशमुख यांच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अटकेनंतर कराड याचे अनेक काळे धंदे उघडकीस आले. त्याचा आणखी एक कारनामा पुढे आला असून वाल्मीक कराड हा फिल्म प्रोडूसर असल्याचे आज उघडकीस आले आहे, त्यामुळे त्याने चित्रपट निर्मितीत पैसे गुंतवले का?, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे बीडमधील सर्व कार्यक्रमाचे नियोजन हा वाल्मीक कराड (Walmik Karad) करायचा. मुंडे यांचा दौरा, पक्षाच्या प्रमुख नेतेमंडळींच्या दौऱ्यांचा इव्हेंट वाटावा, एवढं भपकेबाज नियोजन हा वाल्मीक कराड करायचा. सिनेअभिनेत्रींपासून कीर्तनकरांपर्यंत अनेक मोठे कार्यक्रम परळीत झाले, त्याचे नियोजन कराड करायचा. आता वाल्मीक कराडचा आणखी एक ‘उद्योग’ पुढे आला आहे.

वाल्मीक कराड हा फिल्म प्रोडूसर (film producer) होता, असे समोर आले आहे. वाल्मीक कराड याचे आयडी कार्ड सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. कराड याच्या नावाचे इंडियन मोशन पिक्चर प्रोडूसर असोसिएशनचे आयडी कार्ड आहे. बी. आर. जे. फिल्म प्रोडक्शनचा वाल्मीक कराड हा आजीवन सभासद असल्याचे पुढे आले आहे. त्याचा सभासद नंबर 23480 असल्याचे त्यात दिसून येत आहे.

Walmik Karad
Shambhuraj Desai : 'कामराचं कोणाशी कनेक्शन?, त्याच्या ‘शो’ला कोण पैसे देतंय?, कॉल डिटेल्स ही माहिती आमच्याकडे; त्याला पोलिसांचा टायरमधील पाहुणचार द्यावाच लागेल'

वाल्मीक कराड याच्या बीकेसीमधील याच फिल्म प्रॉडक्शनच्या ऑफिसचे फोटो देखील समोर आले आहेत, त्यामुळे वाल्मीक कराड हा चित्रपट निर्माता होता का, असा सवाल उपस्थित होत आहे. संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणामुळे चर्चेत आलेला वाल्मिक कराड हा खून, खंडणी आणि इतर गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे.

Walmik Karad
Laxman Dhoble : लक्ष्मण ढोबळेंचा अजितदादांना सल्ला; म्हणाले, ‘अर्थमंत्रालयाच्या ‘त्या’ फाईलवर सही करा, ती फायदेशीर ठरेल’

बीडमध्ये औष्णीक वीज प्रकल्पाच्या राखेतून कोट्यवधी रुपये कमावले आहेत. याशिवाय इतर अवैध धंद्यातून कराड याने कोट्यवधीची माया कमवाली आहे, तो ब्लॅक मनी वाल्मी कराड याने कमावला आहे, तो ब्लॅक मनी कराड याने चित्रपट क्षेत्रात गुंतवला का, असा सवाल वाल्मीक कराड ह्याच्या नावाने सापडलेल्या आयडी कोर्डमुळे उपस्थित होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com