Ramsheth Thakur News: रयत शिक्षण संस्थेला 100 कोटींची देणगी; कोण आहेत रामशेठ ठाकूर?

Satara Rayat Shikshan Sansthan News: कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लावलेल्या रयत शिक्षण संस्थेंच रोपटं वाढवण्यात सामान्य नागरिकांपासून अनेक दानशुर व्यक्तींचा हात आहे.
Ramsheth Thakur felicitated by Sharad Pawar:
Ramsheth Thakur felicitated by Sharad Pawar:Sarkarnama

Ramsheth Thakur felicitated by Sharad Pawar : रयत शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी आणि रायगडचे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचा ( ९ मे) खासदार शरद पवार यांच्या हस्ते त्यांचा सपत्निक खास सत्कार करण्यात आला. याला कारणही तसेच आहे. (Who is Ramsheth Thakur who donated 100 crores to Rayat Shikshan Sansthan)

ठाकूर दाम्पत्यानेआतापर्यंत रयत शिक्षण संस्थेला तब्बल १०० कोटी रुपयांची देणगी दिली आहे. याच कारणास्तव आज शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते ठाकूर दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. शरद पवार यांच्या कुटुंबातील व्यक्ती, दिवंगत पतंगराव पाटील यांचे कुटुंब आणि राज्‍याच्या विविध भागांतील दानशूर सातत्याने मदत करत असतात.

Ramsheth Thakur felicitated by Sharad Pawar:
Shrikant Shinde On Ajit Pawar: ''ज्यांच्यावर 'काका मला वाचवा' म्हणण्याची वेळ, ते...''; खासदार शिंदेंचा अजितदादांवर पलटवार

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लावलेल्या रयत शिक्षण संस्थेंच रोपटं वाढवण्यात सामान्य नागरिकांपासून अनेक दानशुर व्यक्तींचा हात आहे. सामान्यांच्या देणगीवरच रयत शिक्षण संस्था चालली आहे. प्रारंभीच्या काळापासूनच कर्मवीरांना अनेकांनी एक रुपयांपासून ते वसतिगृहातील मुलांच्या भोजनासाठी मूठ मूठ धान्य दिले आहे. मिळेल त्या मार्गाने अनेकांनी संस्थेला सातत्याने मदत केली. रामशेठ ठाकूर हेदेखील त्या देणगीदारांमधलेच एक दानशूर. (Satara News)

ठाकूर यांचे आणि रयत शिक्षण संस्थेचे नातेही तसे जुनेच आहे. रामशेठ ठाकूर हेदेखील रयत शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी. कमवा व शिका योजनेतून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षणानंतर ते मोठे उद्योजक झाले. पण रयत शिक्षण संस्था आणि शिवाजी कॉलेजला ते कधीच विसरले नाहीत. त्यांची स्वतःची संस्था असूनही त्यांनी कायम रयत शिक्षण संस्थेसाठी मदतीचे दरवाजे खुले ठेवले. गेल्या काही वर्षात दर वर्षी नऊ मे च्या दिवशी कर्मवीर पुण्यतिथी कार्यक्रमात त्यांनी देणगी जाहीर केली नाही, असा एकदाही झालं नाही. (Maharashtra Politics)

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com