Ahmednagar News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांची राज्यातल्या मतदारंसंघासाठी चाचपणी सुरू आहे. 2024 ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी अहमदनगर दक्षिण या लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे आमदार व माजी मंत्री राम शिंदे यांनी उमेदवारीसाठी दावा केला होता. यानंतर 2024 ला लोकसभेची निवडणूक खासदार सुजय विखे लढवणार की आमदारराम शिंदे लढवणार याबद्दल संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये आहे. (Latest Marathi News)
याच पार्श्वभूमीवर खासदार सुजय विखे यांना याबाबत विचारले असता विखे यांनी याबाबत भाजप पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील, त्यानुसार तो उमेदवार असेल असे स्पष्ट केले आहे. कुणी वैयक्तिक दावा करत असल्यास किंवा माझेही उमेदवारी पुन्हा होऊ शकेल, अशी परिस्थिती नसून ते पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर पक्षश्रेष्ठी निर्णय याबाबत घेतील, असे विखे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत. याचं निमित्त साधून सध्या लोकसभा मतदारसंघनिहाय संपर्क अभियान सुरू आहे. त्याच अनुषंगाने गेल्या नऊ वर्षाच्या काळात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने देशभर राबवलेल्या विविध योजना, घेतलेले निर्णय आणि त्याचा जनतेला झालेला फायदा याबाबत जनजागृती करण्यासाठी हे अभियान राबवले जात आहेत.
याच बरोबर नरेंद्र मोदी अॅट नाईन हा एक महिन्याचा कार्यक्रम लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या वतीने राबविण्यात येत असून या द्वारे केंद्र सरकारच्या विविध योजना, निर्णय यांची माहिती देतानाच जनसामान्यांना पक्षाबरोबर जोडणे, पक्षातील वरिष्ठांचा सन्मानपूर्वक त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करणे, मेळावे घेणे युवक युवती यांचे मेळावे, रोजगार व्यावसायिक योजना याबद्दलची माहिती आदि विविध कार्यक्रम लोकसभा मतदार संघात 30 मे ते 30 जून दरम्यान राबवले जाणार आहेत. याची माहितीही यावेळी खासदार सुजय विखे यांनी पत्रकारांना दिली. यावेळी पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष महेंद्र भैय्या जगताप, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, माजी महापौर बाबा वाकळे आदी उपस्थित होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.