Sunita Dhangar Bribery Rates: लाचखोरीचा रात्रीस खेळ चाले..; सुनिता धनगरांचे असे होते लाच घेण्याचे रेट..

Sunita Dhanagar Rate of Bribery : मी कामासाठी भरपूर वेळ देते, अशा गमजा धनगर मारायच्या.
Sunita Dhangar
Sunita Dhangar Sarkarnama
Published on
Updated on

Sunita Dhanagar Rate of Bribery : नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी सुनीता धनगर व लिपिक नितीन जोशी यांना लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर आता रोज विविध धक्कादायक माहिती समोर येत आहे.

धनगर यांना पन्नास तर जोशी याला पाच हजार रुपयांची लाच घेताना पकडले. महापालिका मुख्यालयात सहा वाजेनंतर काम करता येत नाही, असे असताना धनगर या संध्याकाळी सहा वाजेनंतर संबंधितांना बोलावून घ्यायच्या असे उघड झाले आहे.

मी कामासाठी भरपूर वेळ देते..

लाच घेण्याच्या डिलसाठी खालच्या कर्मचाऱ्यांकडून नियमांचा आधार घेऊन आधीचं धावपट्टी तयार करायचे. त्यानंतर ठराविक रक्कमेत कमी-अधिक करून रक्कम निश्चित केली जायची. ती स्वीकारण्यासाठी कर्मचाऱ्यांचा आधार घेतला जायचा. या काळात रात्री उशिरापर्यंत काम करावे लागते. मी कामासाठी भरपूर वेळ देते, अशा गमजा धनगर मारायच्या. जोशी याला घरातूनचं पाच हजार रुपये आणण्याची ताकीद असल्याचे शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Sunita Dhangar
Shiv Sena Bhavan News : काय सांगता ! 'शिवसेना भवना'ला मोठं खिंडार ; पगारवाढ दिली नाही म्हणून चौघे कर्मचारी.. ; असं पहिल्यांदाच..

कोठे व किती पैसै द्यावे

शिक्षक, संस्था चालक व या क्षेत्राशी संबंधित लोकांना कसे व किती पैसे द्यावे लागतात याच्या सुरस कहाण्या आता बाहेर पडू लागल्या आहेत. पैशांच्या देवाण -घेवाणीला कंटाळलेल्या काहींनी लाचखोरीच्या प्रकरणानंतर कोठे व किती पैसै द्यावे लागतात, याची यादीचं बाहेर काढल्याचे कळते.

असे आहेत लाच घेण्याचे रेट?

महापालिका हद्दीतील खासगी शाळा किंवा शिक्षक वैयक्तिक मान्यता

प्रशासनाधिकारी : दोन ते पाच लाख रुपये.

अधीक्षक : १५ ते २५ हजार रुपये.

लिपिक : दहा ते पंधरा हजार रुपये.

जन माहिती अधिकारी : ५०० ते ५ हजार रुपये.

Sunita Dhangar
Shiv Sena Bhavan News : काय सांगता ! 'शिवसेना भवना'ला मोठं खिंडार ; पगारवाढ दिली नाही म्हणून चौघे कर्मचारी.. ; असं पहिल्यांदाच..

महापालिका शाळा शिक्षक बदल्या

प्रशासनाधिकारी ४० ते ५० हजार रुपये.

अधीक्षक- दोन ते पाच हजार रुपये.

लिपिक- पाच हजार रुपये.

पेन्शन प्रकरणे व मेडिकल बिले काढणे

प्रशासनाधिकारी २५ ते ३० हजार रुपये.

अधीक्षक- ५ हजार रुपये.

लिपिक- २ ते ३ हजार रुपये.

जीपीएफ मंजुरी

प्रशासनाधिकारी- ५ ते ७ टक्के.

अधिक्षक- ५ हजार रुपये.

लिपिक- दोन ते तीन हजार रुपये.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com