अजितदादा कोण म्हणता मग, बारामतीत जाऊन शेपूट का घालता...

माझ्या रक्तात काँग्रेस Congress, माझ्यात डीएनएत DNA काँग्रेस Congress आहे, म्हणणाऱ्या आमदारांचा MLA Gore डीएनए बदलला असून रक्ताचेही डायलिसिस झाले आहे. म्हणूनच ते कोलांट्या्उड्या मारत आहेत.
Prabhakar Deshmukh, Jaykumar Gore
Prabhakar Deshmukh, Jaykumar Goresarkarnama
Published on
Updated on

गोंदवले : ज्यांचा डीएनए व रक्तात काँग्रेस आहे, असे म्हणणारे माणचे आमदार कधीच ना पक्षाशी ना जनतेशी प्रामाणिक राहू शकणार नाहीत. स्वपक्षातही नेत्यांसह कार्यकर्त्यांना पीडा वाटू लागलेल्या आमदारांनी चालवलेले नासवानासवीचे नसते उद्योग आता लोकांनी ओळखले आहेत. अजितदादा कोण असं विचारता तर, मग बारामतीत जाऊन त्यांच्यासमोर शेपूट का घालता, असा घणाघात माणचे राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी आमदार गोरेंवर केला आहे.

पळशी (ता. माण) येथील विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांनी दहा जागा जिंकून निर्विवाद सत्ता मिळविली आहे. या विजयी संचालकांचा नेते प्रभाकर देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्री. देशमुख म्हणाले, ''दहिवडी व वडुज नगरपंचायतीत पराभव होत झाल्यानेच आमदार गोरेंचा तोल जाऊ लागल्याने ते आता काहीही बरळत आहेत.

Prabhakar Deshmukh, Jaykumar Gore
महिलांनी पुरुषांना कायद्याचा धाक दाखवलाच पाहिजे : अजित पवार

त्यांच्या सांगली ते व्हाया मायणी मार्गे पनवेलपर्यंतच्या सर्व बाबी माझ्याकडे पुराव्यासह आहेत. त्या योग्य त्यावेळी सर्वांसमोर आणणार आहे. बळजबरीने हिसकवलेल्या मायणी मेडिकल कॉलेज कसे ताब्यात घेतले त्या माध्यमातून कोरोना काळात शासनाच्या योजनेतून गरिबांना सेवा देण्याऐवजी लुबाडणूक करण्यात आली. आरोग्य सेवेच्या नावाखाली चालवलेल्या धंद्याचे पितळ उघडे पडल्यानेच त्यांची या काळातील बिले अजूनही शासनांकडून मिळालेली नाहीत.''

Prabhakar Deshmukh, Jaykumar Gore
देशमुखांची संपत्ती आता रडारवर...जयकुमार गोरेंचा इशारा

''माझ्या रक्तात काँग्रेस, माझ्यात डीएनएत काँग्रेस आहे म्हणणाऱ्या आमदारांचा डीएनए बदलला असून रक्ताचेही डायलिसिस झाले आहे. म्हणूनच ते कोलांट्या्उड्या मारत आहेत. अशा व्यक्तीला जवळ केल्याचा पश्चाताप होत असल्याचे आजही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बोलून दाखवतात. ज्या पक्षात ते सध्या आहेत तिथले लोक सुद्धा या नसत्या पिडेला वैतागले आहेत.''

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com