Ramdas Athwale on CM Post: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपमध्ये सामील होण्याच्या चर्चांमुळे राज्यात गेल्या आठवड्यात मोठ्या घडामोडी झाल्या.अजित पवार यांच्याबाबत सुरु असलेल्या या चर्चांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Will Ajit Pawar become Chief Minister if he joins BJP? Central leader's big statement...)
मुख्यमंत्री पदाबाबत चढाओढ सुरू आहे.मुख्यमंत्री होण्याची प्रत्येक नेत्याची इच्छा असते. तशी अजित पवार यांचीही आहे. पण ती इच्छा सगळ्यांचीच पूर्ण होत नाही. अजित पवार भाजपमध्ये आले तरीही त्यांना मुख्यमंत्रिपदाची संधी लवकर मिळेल असे नाही.पण जोपर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत दुसऱ्या कोणाचा नंबर लागणार नाही, असं आठवले (Ramdas Athawale) यांनी म्हटलं आहे.
महाविकास आघाडीमध्येही अजितदादांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळेल, असं वाटत नाही.आम्हाला अजित पवारांची गरज नाही. शरद पवार यांनी एनडीएसोबत यायला पाहिजे. मी आलो आहे तर त्यांना यांना यायला काय हरकत आहे. असा सवालही रामदास आठवले यांनी केला. तसेच शरद पवार यांनी आता ठोस निर्णय घ्यावा, ज्यांना जायचे त्यांनी जावं, असं म्हणण्यापेक्षा शरद पवार यांनीच एनडीएमध्ये सामील व्हाव, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. (Maharashtra Politics)
विशेष म्हणजे, राज्यात सध्या मुख्यमंत्रीपदासाठी स्पर्धा सुरू असताना आपणही मुख्यमंत्रीपदासाठी इच्छूक असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. इतकेच नव्हे तर भविष्यात दलित मुख्यमंत्र्यांचा विचार झाल्यास आपल्या संधी मिळावी, असही रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.