शिवसेनेतील बंडानंतर राज्यात भाजपचे सरकार येणार का...? धनंजय महाडिक म्हणाले...

बंडखोरांकडून काय निर्णय होतो, यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत : भाजपचे नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य (खासदार) धनंजय महाडिक
Dhananjay Mahadik
Dhananjay Mahadik Sarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भारतीय जनता पक्षाची (bjp) भूमिका ही 'वेट अँड वॉच'ची आहे. शिवसेनेच्या (shivsena) बंडखोर आमदारांनी जी भूमिका घेतलेली आहे, त्यावर भाजप लक्ष ठेवून आहे. भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), चंद्रकांत पाटील (chandrakant Patil) यांनी अजून कोणतीही भूमिका घेतलेली नाही. बंडखोरांकडून काय निर्णय होतो, यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असे भाजपचे नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य (खासदार) धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी सांगितले. (Will BJP government in maharashtra after Shiv Sena rebellion ...? Dhananjay Mahadik said ...)

मोहोळ तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खासदार महाडिक हे सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांना सध्या राजकीय उलथापालथीनंतर राज्यात भाजपचे सरकार बसेल का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर खासदार महाडिक यांनी वरील उत्तर दिले.

Dhananjay Mahadik
'राऊतांच्या सल्ल्याने अख्खी शिवसेना पवारांच्या दावणीला बांधायची का?'

खासदार महाडिक म्हणाले की, राज्यात भाजप सरकार येणार की नाही, याबाबत आज बोलणे योग्य होणार नाही. सध्याच्या परिस्थितीवर भारतीय जनता पक्षाची भूमिका ही 'वेट अँड वॉच'ची आहे. कारण राज्यात आज अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. अशी परिस्थिती यापूर्वी कधीही आलेली नव्हती, त्यामुळे त्यावर आज बोलणे उचित ठरणार नाही.

Dhananjay Mahadik
'संजय राऊतांनी किती आमदार, खासदार निवडून आणलेत?' : शिंदे समर्थकांचे डोंबिवलीत शक्तिप्रदर्शन

महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यामुळं हे सरकार कोलमडेल, अशी चिन्ह दिसत असताना राज्यातील विरोधी पक्ष भाजप मात्र याकडे 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत दिसून येत आहे. राज्यातील सर्वच नेते यावर बोलण्यास तयार नाहीत. एकीकडे शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे आपल्यामागे शक्तीशाली पक्ष असल्याचे सांगत असताना भाजप नेते मात्र याबाबत हात झटकत आहेत. हा शिवसेनेतील अंतर्गत प्रश्न आहे, त्यावर आम्ही बोलणे उचित नाही, असे सर्रास सर्व नेते सांगत आहेत.

Dhananjay Mahadik
संजय बनसोडे ठरले बंडाचे लाभार्थी : आता गृहखात्याचा कारभार पाहणार... !

दरम्यान, खासदार धनंजय महाडिक यांनी सोलापुरात जिल्हा उपनिबंधक कार्यालयात येऊन भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरला. या वेळी त्यांनी शिवसेनेकडून सुरू असलेल्या तोडफोडीवरही बोलण्यास नकार दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com