Dilip Sopal-Eknath Shinde-Rajendra Raut
Dilip Sopal-Eknath Shinde-Rajendra RautSarkarnama

Barshi Constituency : डीसीसी बॅंक लुटून 320 कोटींचा घपला करणाऱ्याला निवडून देणार का?: मुख्यमंत्र्यांचा सोपलांवर हल्लाबोल

CM Eknath Shinde in Barshi: बाळासाहेब ठाकरे यांनी 90 च्या दशकात ज्या तरुणांना एकत्र केले, त्यातला एक म्हणजे राजा राऊत आहे. आज राजा राऊतांची खऱ्या अर्थाने घरवापसी झालेली आहे.
Published on

Solapur, 08 November : राजाची तुमच्यावर काय जादू आहे, मला माहिती नाही. विरोधी उमेदवाराने जंगजंग पछाडलं, तरी हा राजा राऊत विजयी होणार आहे. ज्यांनी 320 कोटींचा घपला करून डीसीसी बँक लुटली, त्यांना तुम्ही निवडून देणार का? आर्यन कारखाना बंद पडून, उस कामगार टोळ्यांचे पैसे बुडावणाऱ्या लुटारूंच्या टोळक्यांच्या म्होरक्याला, कलम 420 लागणाऱ्याला तुम्ही मतदान करणार का..? अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मंत्री दिलीप सोपल यांच्यावर हल्लाबोल केला.

बार्शी मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. ते म्हणाले की, एक सच्चा हाडाचा आणि बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेला महायुतीचा सच्चा शिलेदार म्हणजे राजेंद्र राऊत. त्यांच्या समोरील धनुष्य बाणाचे बटन एवढं दाबा की समोरच्यांचा पत्ता गुल झाला पाहिजे, त्यामुळे त्यांच्या विजयासाठी मी राजेंद्र राऊत यांचा अभिनंदन करत आहे.

बार्शी तालुक्यातील 86 हजार बहिणी आणि 86 हजार भाऊजींनो, तुम्ही समोरच्यांचं डिपॉजिट जप्त करणार ना..? राजेंद्र राऊत यांना निवडून आणा, 23 तारखेला गुलाल उधळायला हा एकनाथ शिंदे परत येईल, असा शब्दही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बार्शीच्या सभेत बोलताना दिला.

Dilip Sopal-Eknath Shinde-Rajendra Raut
Maharashtra Politics: 'दी बुक दॅट शॉक्ड बीजेपी!' भुजबळांच्या कथित दाव्यांनी विरोधकांच्या हाती कोलीत

बार्शीच्या भगवंताच्या नगरीमध्ये मी जनतारुपी भगवंताचं दर्शन घ्यायला आलो आहे. राजेंद्र राऊत यांच्या सभेसाठी जेवढे बांधव मंडपात आहेत, तेवढेच बांधव बाहेरही आहेत. राजेंद्र राऊत हा खरंच राजा माणूस आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी आमदार राजेंद्र राऊत यांचा हात उंचावून कौतुक केलं.

बाळासाहेब ठाकरे यांनी 90 च्या दशकात ज्या तरुणांना एकत्र केले, त्यातला एक म्हणजे राजा राऊत आहे. आज राजा राऊतांची खऱ्या अर्थाने घरवापसी झालेली आहे. राजेंद्र राऊत यांच्या हातात धनुष्यबाण शोभून दिसतो; कारण बाळासाहेबांचे विचार त्यांच्या मनामध्ये आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Dilip Sopal-Eknath Shinde-Rajendra Raut
Barshi Constituency : जरागेंवर बोलणाऱ्यांचा असा सुफडासाफ करा की पुन्हा हिम्मत झाली नाही पाहिजे; ओमराजेंचे बार्शीकरांना आवाहन

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यात महायुतीचं सरकार आलं आणि बार्शी मतदारसंघात 4 हजार कोटी रुपये मिळाले. या अगोदर हे पैसे कुठे जातं होते. भगवंत तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची 300 कोटी रुपयांची मागणीही मी मान्य करतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com