बारामती जिंकणं शक्य; पण पवारसाहेबांच्या...: महादेव जानकरांनी सांगितली व्यूहरचना!

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा पराभव झाला होता, त्यामुळे बारामतीत काही शक्य नाही, असे नाही. सर्व काही शक्य आहे.
Mahadev Jankar
Mahadev JankarSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने (BJP) नीट नियोजन केलं आणि ते यशस्वी करण्याचा प्रयत्न केला तर बारामती (Baramati) जिंकणं शक्य आहे. बारामतीची जनता फार सुज्ञ आहे, त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातसुद्धा बदल होऊ शकतो. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा पराभव झाला होता, त्यामुळे बारामतीत काही शक्य नाही, असे नाही. सर्व काही शक्य आहे. पण, पवारसाहेबांच्या (Sharad Pawar) दबावाला कुठल्याही राजकीय पक्षाने बळी पडलं नाही पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे, अशा शब्दांत बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्याची व्यूहरचना माजी मंत्री महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी भाजपला सांगितली. (Winning Baramati Lok Sabha constituency is possible : Mahadev Jankar)

Mahadev Jankar
बारामतीत भाजप कोणाला मैदानात उतरवणार? हर्षवर्धन पाटील, काळे की कांचन कुल?

दिल्लीत एक वृत्तवाहिनीशी बोलताना आमदार जानकर यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ कसा जिंकता येऊ शकतो, हे स्पष्ट केले. ते म्हणाले की, बारामती लोकसभा मतदारसंघात सतत उमेदवार बदलल्यामुळे भाजपचा तोटा होत गेला, हे वास्तव आहे. भाजप हा मोठा पक्ष आहे, त्यांना सल्ला देण्याएवढा मी मोठा नाही. पण, बारामतीची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला दिली असती तर आम्ही अधिक ताकदीने लढलो असतो. कारण, राष्ट्रीय समाज पक्षाला जेवढी मतं मिळाली होती, तेवढी मतं भाजपच्या उमेदवाराला मिळाली नव्हती, हेही लक्षात ठेवले पाहिजे. उमेदवारीच्या दृष्टीने भाजपने एकाच कोणातरी व्यक्तीवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे.

Mahadev Jankar
‘नरहरी झिरवळ पुन्हा हंगामी अध्यक्ष होऊन त्या आमदारांवर अपात्रतेची कारवाईही होऊ शकते’

बारामती लोकसभा मतदारसंघात एका बाजूला धरणं आहेत, दुसरीकडे पाण्याचा प्रश्न आहे. इंदापूर तालुक्यातील ३२, बारामती विधानसभा मतदारसंघात २६ गावांत पाणीप्रश्न अजूनही कायम आहे. बारामती तालुक्यातील सुपे, उंडवडी या भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई असते. तीच अवस्था वेल्ह्याची आहे. वेल्हे डोंगरी तालुका असल्याने त्या ठिकाणचाही विकास अद्याप झालेला नाही. भोर, वेल्ह्यात धरणं आहेत. मात्र, पाण्याची बोंब आहे, अशा समस्याही जानकर यांनी या वेळी मतदारसंघातील सांगितल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com