राहुल गडकर
Kolhapur : अंगावर खाकी शर्ट, हातात टपाल आणि 'ओ काकी, मामा' अशी हाक देत खासदार पुत्राला दारात पाहताच अनेक जण चक्रावले. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक आज (सोमवारी) पोस्टमनच्या रूपात शहरभर फिरले. त्यांचे हे रूप पाहून अनेक जण चक्रावले.
युथ आयकॉन कृष्णराज यांनी आज पोस्टमन यांच्या कार्याला केलेला अनोखा सन्मान सध्या कोल्हापुरात जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला. त्यांच्या सोशल मीडिया फ्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे. निमित्त होते आज जागतिक पोस्टमन दिवस, पोस्टमन यांच्या कार्याला सलाम आणि प्रेरणा देण्यासाठी आज युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी स्वतः कसबा बावडा येथे जाऊन अनोखा उपक्रम राबवला.
स्वतः पोस्टमन यांचा ड्रेस घालून त्यांनी पोस्टमन यांच्या कामाची जबाबदारी जाणून घेतली. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कामाचे नियोजन समजावून घेतले. शिवाय कृष्णराज यांनी आलेले टपाल शॉर्टेज करून त्यावर पोस्टाचा शिक्का मारत पोस्टमन यांच्या कामाचा हिस्सा बनले. दिवसभर पोस्टमन कोणत्या स्थितीचा सामना करतात. यांचा अनुभव घेत शहरभर टपाल वाटण्याचा आनंद त्यांनी घेतला. पोस्टमनच्या रूपात कृष्णराज दारात आलेले पाहताच अनेकांना धक्का बसला. कृष्णराजच्या या उपक्रमाचे त्यांच्याकडून कौतुक झाले.
कृष्णराज सोशल मीडियावर अॅ क्टिव्ह
कृष्णराज महाडिक हे युथ आयकॉन म्हणून ओळखले जातात. सोशल मीडियावर ते अनेकांच्या पसंतीस उतरले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवत त्यांनी नवा आदर्श घालून दिलेला आहे. रिक्षा चालकांसाठी मदत असेल, पूरग्रस्तांना मदत, भुकेलेल्यांना अन्न, साधारण आधार देण्याचं काम सोशल मीडियाच्या माध्यमातून कृष्णराज यांनी केलेले आहे. सोशल मीडियातून मिळालेले पैसे ते सामाजिक कार्यावर खर्च करत असल्याचेही उदाहरण आहेत.
इतरांना समजून घ्यायचंय : कृष्णराज
मला नेहमीच इतरांबद्दल आदर आहे. त्यांच्यामध्ये जाऊन त्यांच्यातील भाग बनण्याची इच्छा असते. गणेशोत्सव काळातदेखील कुंभार, नाभिक समाजासोबत त्यांचे काम पाहिले आहे. नुकतेच पोस्टमन डेनिमित्त मी पोस्टमन यांच्या कामाची माहिती घेऊन त्यांच्या कामात सहभागी झालो. त्यांच्यातील एक भाग मला होता आले. याचा आनंद मला नक्की आहे, अशी प्रतिक्रिया कृष्णराज महाडिक यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.