Central Election Commission News : राजस्थान, मिझोरामसह पाच राज्यांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले; तीन डिसेंबरला मतमोजणी

Assembly Elections News : तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबर रोजी, तर मध्य प्रदेशमध्ये १७ नोव्हेंबर, तर राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे.
election commissions
election commissions sarkarnama
Published on
Updated on

New Delhi : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (सोमवारी) पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. मिझोराममध्ये ७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. छत्तीसगडमध्ये ७ आणि १७ नोव्हेंबर, तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबर रोजी, तर मध्य प्रदेशमध्ये १७ नोव्हेंबर, तर राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तीन डिसेंबर रोजी पाचही राज्यांची मतमोजणी होईल.

election commissions
Sanjay Raut News : महापालिकांच्या निवडणुका कधी घेणार? संजय राऊतांचा निवडणूक आयोगाला सवाल

लोकसभेच्या आधी लिटमस चाचणी म्हणून या निवडणुकांकडे पाहिले जाते. या पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका या सर्वच राजकीय पक्षांसाठी लोकसभेची उपांत्य फेरी असणार आहे.

मध्य प्रदेशात विधानसभेच्या 230 जागा आहेत. राजस्थानमध्ये 200 जागा आहेत तर मणिपूरमध्ये 40, छत्तीसगडमध्ये 90 आणि तेलंगणामध्ये 119 जागांवर विधानसभा निवडणूक होत आहे. सध्या राजस्थान आणि छत्तीसगड या दोन राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, तर मध्य प्रदेशात भाजपची सत्ता आहे.

केसीआरच्या नेतृत्वाखालील भारत राष्ट्र समिती तेलंगणात सत्तेवर आहे आणि मिझो नॅशनल फ्रंट (एमएनएफ) मिझोराममध्ये सत्तेत आहे. राजस्थान राज्यात प्रत्येक पाच वर्षानंतर सरकार बदलत असते. त्यामुळे राजस्थानमध्ये परंपरेनुसार सत्ताबदल होतो की काँग्रेसची सत्ता कायम राहते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मिझोराम - 7 नोव्हेंबर रोजी मतदान

छत्तीसगड - 7 आणि 17 नोव्हेंबर रोजी मतदान

मध्य प्रदेश - 17 नोव्हेंबर रोजी मतदान

राजस्थान - 23 नोव्हेंबर रोजी मतदान

तेलंगाणा - 30 नोव्हेंबर रोजी मतदान

पाच राज्यांचा निकाल - 3 डिसेंबर रोजी

election commissions
Babanrao Lonikar News: मी मंत्री होणार की नाही हे देव अन् देवेंद्र यांच्याच हातात; बबनराव लोणीकरांची मिश्किल टिप्पणी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com