Raj Thackeray Secret Blast : भाजपच्या ऑफरबाबत राज ठाकरे प्रथमच बोलले; ‘पण मी अजून निर्णय घेतलेला नाही...’

MNS NEWS : युती, आघाडी करण्याचा निर्णय हा माझा असेल, त्यात तुम्ही पडायचं नाही.
Raj Thackeray
Raj Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भारतीय जनता पक्षाकडून मला (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) युतीची ऑफर आहे. मात्र, युतीबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असा गौप्यस्फोट मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. युतीचे सरकार सत्तेवर आल्यापासून ही कुजबूज राज्यात सुरू होती. मात्र, भाजपच्या ऑफरवर राज ठाकरे आज पहिल्यांदाच बोलले आहेत. (BJP offer me; But I haven't decided yet: Raj Thackeray's secret blast)

मनसेची संघटनात्मक बैठक सोमवारी (ता. १४ ऑगस्ट) मुंबईत वांद्र्यात पार पडली. त्यात मनसेचे नेते आणि सरचिटणीस सहभागी झाले होते. समोर बोलताना राज ठाकरे यांनी भाजपकडून युतीबाबत आलेल्या ऑफरबाबत प्रथमच भाष्य केले. आपल्याला भाजपकडून युतीची ऑफर आहे. पण, त्याबाबत आपण अजून निर्णय घेतलेला नाही. पण याबाबत तुम्ही साधी चर्चाही करायची नाही, असेही राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना बजावले.

Raj Thackeray
Dharashiv Lok Sabha Election : शिवसेना, राष्ट्रवादीच्या मतदारसंघावर काँग्रेसचा दावा; अमित देशमुखांनी उमेदवारही ठरवला

युती, आघाडी करण्याचा निर्णय हा माझा असेल, त्यात तुम्ही पडायचं नाही. याबाबतीत तुम्ही चर्चासुद्धा करायची नाही, पक्ष वाढवणे हे आताच्या घडीला महत्वाचे आहे, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी नेते आणि सरचिटणीस यांच्या बैठकीत बोलताना सांगितले.

Raj Thackeray
Pawar on Siddheshwar Chimney: शरद पवारांचे सिद्धेश्वर कारखाना चिमणीसंदर्भात प्रथमच भाष्य; ‘आम्ही लोकांनी त्यात लक्ष घातले आहे...’

पुढील वाटचालीत भाजप अजित पवार यांच्याबाबत काय निर्णय घेणार आहे, याबाबतची कुठलीही स्पष्टता नाही, त्यामुळे अजूनही आपण कुठलाही निर्णय घेतलेला नाही, असेही राज ठाकरे यांनी पक्षाच्या बैठकीत बोलताना सांगितले.

Raj Thackeray
Solapur Politics: शरद पवार चार वर्षांनंतर 'शिवरत्न'वर; विजयदादांच्या प्रकृतीची केली विचारपूस

लोकसभेसाठी मनसेची अशी असणार रणनीती

लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी ही बैठक होती. मनसेसाठी अनुकूल असलेल्या लोकसभा मतदारसंघाची यादी राज ठाकरे यांनी केली आहे. त्यात एक लोकसभा संघटक आणि ११ पदाधिकारी असणार आहेत. हे बारा पदाधिकारी संबंधित लोकसभा मतदारसंघात जाऊन पक्षाबाबत जनतेची मते काय आहेत, हे जाणून घेतील. त्यानंतर राज ठाकरे हे त्या मतदारसंघात दोन दौरे आणि चार मेळावे घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीबाबतची रणनीती या पद्धतीने मनसेने आखली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com