@ 3pm Polling Percentage : पुढील काही तासांत मतदानाची टक्केवारी वाढली नाही, तर धोका कोणाला ?

Maharashtra Election : मतदानाची घसरलेली टक्केवारी कोणाला धोका निर्माण करते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. राज्यात नागपूर आणि रामटेक मतदारसंघांत मतदानाची टक्केवारी दुपारी 3 वाजता घसरल्याचे चित्र होते.
Chandrapur Lok Sabha Polling booth
Chandrapur Lok Sabha Polling boothSarkarnama

Lok Sabha Election 2024 : गेल्या लोकसभा निवडणुकीत रामटेक येथे 62 टक्के, नागपूर येथे 55 टक्के, भंडारा गोंदिया येथे 68 टक्के, गडचिरोली चिमुर मतदारसंघात राज्यात सर्वाधिक 72 टक्के मतदान झाले होते, तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 65 टक्के मतदान झाले होते. पाच लोकसभा मतदारसंघांत 2019 मध्ये तीन ठिकाणी भाजप एका ठिकाणी अर्थात चंद्रपूर येथे काँग्रेस आणि रामटेक येथे शिवसेना जिंकली होती. यंदा मात्र मतदानाची टक्केवारीचा अंतिम आकडा प्राप्त झाला नसला तरी प्रत्येक मतदारसंघात लढत अतिशय तुल्यबळ होण्याची चिन्ह निर्माण झाले आहे.

आज दुपारी 3 वाजेपर्यंत नागपूर 38.43 टक्के व रामटेक 40.10 टक्के लोकसभा मतदारसंघात मतदान झाले. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात 45.88 टक्के, तर चंद्रपूर मतदारसंघात 43.48 टक्के, गडचिरोली चिमुर मतदारसंघात 55.79 टक्के मतदान दुपारी तीन वाजेपर्यंत झाले आहे. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chandrapur Lok Sabha Polling booth
Lok Sabha Election 2024 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग हातून गेल्यानंतर सामंत बंधू नारायण राणेंच्या प्रचारात...

राज्यात पहिल्या टप्प्यात होत असलेल्या निवडणुकीत दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी म्हणावी तशी समाधानकारक नाही. पाचही लोकसभा मतदारसंघांत सरासरी टक्के मतदान झाल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे. नागपूर येथे मतदानाची टक्केवारी घसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. येथे भाजप उमदेवार नितीन गडकरी आणि काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांच्यात लढत आहे. नागपूर येथे एकूण 26 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे काही उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघ 38.43 टक्के तर नागपूर लोकसभा मतदारसंघात दूपारी 3 वाजेपर्यंत सरासरी एकूण टक्के मतदान झाले. नागपूर लोकसभा मतदारसंघातील नागपूर मध्य 35.70 टक्के, नागपूर पूर्व 41.35 टक्के, नागपूर उत्तर 32.02 टक्के, नागपूर दक्षिण 39.81 टक्के, नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ 42.00 टक्के, नागपूर पश्चिम 39.73 टक्के मतदान झाले आहे.

रामटेक मतदारसंघात 40.10 टक्के मतदान झाले आहे. या ठिकाणी जात वैधता प्रमाणपत्राने उमेदवार बदलण्याची वेळ काँग्रेसवर आली होती. या मतदारसंघात शिवसेना उमेदवार राजू पारवे यांच्याशी थेट लढत श्यामकुमार बर्वे यांच्याशी आहे. रामटेक मतदारसंघात एकूण 20 लाखांपेक्षा अधिक मतदार आहेत, तर एकूण 28 उमेदवार रिंगणात आहेत. रामटेक लोकसभा मतदारसंघ मिळून 124 संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. रामटेक 45.33 टक्के, यात काटोल 41.79 टक्के, सावनेर 42.59 टक्के, हिंगणा 31.30 टक्के, उमरेड 46.08 टक्के, कामठी 38.56 टक्के मतदान झाले आहे.

गडचिरोली - चिमुर लोकसभा मतदारसंघात एकूण 10 उमेदवार रिंगणात आहे. प्रमुख लढत ही भाजप उमेदवार अशोक नेते व काँग्रेस उमेदवार डाॅ. नामदेव किरसान यांच्यात आहे. एकूण 16 लाखांपैकी किती मतदार मतदानाचा अधिकार वापरतात हे पाहण्यासारखे असेल. गडचिरोली चिमुर लोकसभा मतदारसंघातील आमगाव 54.38 टक्के, आरमोरी 56 टक्के, गडचिरोली 65.30 टक्के, अहेरी 62.80 टक्के, ब्रम्हपुरी 45.58 टक्के आणि चिमूर 50.36 टक्के मतदान झाले.

राज्यात गेल्या निवडणुकीत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात फक्त काँग्रेस विजयी झाली होती. पण, सुरेश उपाख्य, बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर काँग्रेसने त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली. त्यांची थेट लढत भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याशी आहे. जवळपास 18 लाख मतदार या मतदारसंघात आहेत, तर एकूण 15 उमेदवार या मतदारसंघात रिंगणात आहेत. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात चंद्रपूर 37.94 टक्के, राजुरा 43.25 टक्के , बल्लारपूर 47.74 टक्के , वरोरा 44.59 टक्के, वणी 47.50 टक्के, आर्णी 41.40 टक्के मतदान विधानसभा क्षेत्रनिहाय झाले आहे.

भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपचे सुनील मेंढे यांची थेट लढत डाॅ. प्रशांत पडोळे यांच्यासोबत आहे. या मतदारसंघात एकूण 18 लाख मतदार आहे. तर एकूण 18 उमेदवार रिंगणात आहे. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात तुमसर 44.66 टक्के , भंडारा 44.01 टक्के, साकोली 45.93 टक्के, अर्जुनी मोरगाव 53.20 टक्के, तिरोडा 44.02 टक्के, गोंदिया 44.86 टक्के मतदान विधानसभा क्षेत्रनिहाय झाले आहे. पुढील काही तासांत मतदानाची टक्केवारी वाढली नाही तर धोका कोणाला, असा प्रश्न विविध लोकसभा मतदारसंघात विचारला जात आहे. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढीसाठी राजकीय पक्षांना पुढील काही तास कंबर कसावी लागणार आहे.

R

Chandrapur Lok Sabha Polling booth
Supriya Sule News : 'भ्रष्टाचाराचा आरोप झाला एक जण भाजपत गेला', सुप्रिया सुळेंनी केली पोलखोल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com