Sanjay Raut News : 'तो' फोटो! खासदार राऊतांचे सूचक ट्विट; व्वा! क्या सीन है? नक्की कोण कुणाचा 'आका'?

Sanjay Raut tweet news : फरार असलेल्या वाल्मिक कराड याचा एक फोटो शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करीत खळबळ उडवली आहे.
Sanjay raut, Walmik karad
Sanjay raut, Walmik karad Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. त्यांनतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेला 21 दिवस पूर्ण झाले असले तरी या प्रकरणांतील फरार आरोपीना ताब्यात घेतलेले नाही. या घटनेचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याची चर्चा आहे. त्यातच या फरार असलेल्या वाल्मिक कराड याचा एक फोटो शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करीत खळबळ उडवली आहे. त्यामध्ये त्यांनी व्वा ! क्या सीन है? नक्की कोण कुणाचा आका? असा प्रश्न उपस्थित करीत सूचक ट्विट केले आहे.

खासदार राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट केलेल्या या फोटोमध्ये बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याचा फोटो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत दिसत आहे. त्या फोटो खाली कॅप्शन टाकून हा फोटो संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे.

या तीन नेत्यासोबत असलेल्या कराड यांच्या फोटोने खळबळ उडाली आहे. या फोटोला त्यांनी क्या सीन है?? नक्की कोण कुणाचा आका? असे कॅप्शन दिले आहे. राऊत यांनी शेअर केलेल्या या फोटोची सत्यता पडताळून पहिली जात आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या फोटोनंतर राज्यातील राजकारण तापणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाल्मिक कराडसह इतर आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. एसआयटी स्थापन केली आहे. सीआयडीकडे तपास दिला आहे. त्यानंतर वाल्मिक कराड सापडत नाही. त्याला अटक करण्याच्या मागणीसाठी रविवारी बीडमध्ये तर सोमवारी बुलढाण्यात मोर्चाही निघाला होता. या मोर्चात संतोष देशमुख यांचे कुटुंबियसुद्धा सहभागी झाले होते.

Sanjay raut, Walmik karad
Suresh Dhas : बीडच्या पालकमंत्रीपदावरून सुरेश धस यांनी केली 'हे' मोठे विधान; म्हणाले,....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com