Akola Lok Sabha : ...मोदी, योगींसह दिग्गज नेत्यांच्या न होणाऱ्या सभांवरून विरोधकांचा 'नथीतून तीर' !

PM Modi and Yogi : संघ वर्तुळातून घराणेशाहीचा आरोप झाल्यानंतर अकोल्यात भाजपच्या प्रचारासाठी दिग्गज नेत्यांनी नकार दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यावरून विरोधकांनी आरोपांचा धुरळा उडविला आहे.
amit Shah, nitin gadkari, yogi aditynath, narendra modi
amit Shah, nitin gadkari, yogi aditynath, narendra modi Sarkarnama

Akola Lok Sabha Election 2024 : राज्यातील राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चेतील शहर असा उल्लेख असलेला मतदारसंघ म्हणजे अकोला. या मतदारसंघात वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशी थेट लढत होत आहे. दोन वेळा काँग्रेसच्या मुस्लिम उमेदवारामुळे आंबेडकर यांना धक्का बसला. यंदा मात्र महाविकास आघाडीसोबत चर्चा करता करता आंबेडकर मात्र इंडिया आणि महाविकास आघाडीच्या रिंगणाबाहेरच राहिले. पण, यंदा काँग्रेसने अकोल्यात डाॅ. अभय पाटील यांना उमेदवारी दिली. संघ वर्तुळ आणि विश्व हिंदू परिषदेत पाटील यांचा घनिष्ट संबंध. पण, संघ वर्तुळाविषयी अभय पाटील यांनी 'छोड आए हम ओ गलिया....' असे म्हणत काँग्रेसचे हात बळकट करणे सुरू केले आहे.

अकोल्यात काँग्रेस म्हणजे दिव्यच. सगळे कसे नेते, कार्यकर्ता कोणीच नाही. त्यामुळे पाटील यांना काँग्रेसच्या नेत्यांबरोबर स्वतःचे कार्यकर्ते उभे करावे लागले. त्यामुळे महाविकासचा घटक म्हणून आमदार नितीन देशमुख आणि शिवसेना काँग्रेसच्या पंजाचा प्रचार करत फिरत आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रचारात आहे. अशाच एका प्रचार सभेत भाजपची अकोल्याची जागा 'डी' म्हणजे डेंजर झोनमध्ये गेल्याचा दावा नितीन देशमुख यांनी केला. त्यांनी थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची अकोल्यातील सभा रद्द झाल्याचा दाखला देत भाजप लोकसभा निवडणुकीच्या रेसमध्ये नसल्याचा आरोप केला. शिवसेना - भाजप युती असताना उमेदवार अनुप धोत्रे यांचे वडील खा. संजय धोत्रे यांनी बाळापूर विधानसभा निवडणुकीत नितीन देशमुख यांच्या विजयासाठी घेतलेले कष्ट आ. देशमुख मात्र विसरल्याचे चित्र आहे. राजकारणात कोणी कोणाचा कायम मित्र नसतो हे अकोल्यात समोर आले आणि शत्रूदेखील नसतो हेदेखील अकोलेकर जनता पाहत आहे. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

amit Shah, nitin gadkari, yogi aditynath, narendra modi
Amol Kolhe On Ajit Pawar : 23 जागांचा निर्णय घेणाऱ्या नेतृत्वाला चारच जागा मिळतात ही शोकांतिका

भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांची उमेदवारी जाहीर झाल्याबरोबर लगेच चंद्रकांत पाटील हे अकोल्यात येऊन गेले. त्यानंतर आढावा बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचा धावता दौरा झाला. त्यानंतर मात्र बड्या नेत्यांचा कुठलाही दौरा आणि सभा अकोल्यात झाली नाही. मोदींची अकोल्यासाठी सभा नाही असे म्हणताच भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झाला आणि आता तर थेट योगीची आयोजित सभा रद्द झाल्याने भाजप कार्यकर्त्यांचा जोश घसरला. त्यात लालाजींच्या (आ. गोवर्धन शर्मा) मृत्यूने अधिकच पोकळी निवडणुकीत दिसून येत आहे. खा.संजय धोत्रे हे प्रकृती कारणाने घराबाहेरदेखील पडू शकत नाही. त्यामुळे निवडणुकीचा सर्व भार हा प्रदेश सरचिटणीस आणि आमदार रणधीर सावरकर, आ. हरिश पिंपळे आणि आ. प्रकाश भारसाकळे त्याच बरोबर आ. वसंत खंडेलवाल यांच्यावर पडल्याचे चित्र आहे. माजी आमदार डाॅ. रणजित पाटील हे दूसऱ्या गटाचे नेते असल्याने ते अनुप धोत्रे यांच्या प्रचारात दिसण्याची शक्यता कमीच आहे.

ओबीसींचे नेते माजी आमदार नारायण गव्हाणकर यांनी तिकीट नाकारल्याने लोकसभेत अर्ज दाखल केला. तो फडणवीसांच्या विनंतीवरून मागे घेतला. गव्हाणकर यांनी अनुप धोत्रेंवर थेट घराणेशाहीचा आरोप केला. अर्ज मागे घेतल्यापासून त्यांनी भाजपचा प्रचार मात्र सुरू केला नाही. संघ वर्तुळाने तिकीट घोषित केल्याबरोबर अनुप धोत्रे यांच्यावर घराणेशाहीचा ठपका ठेवला. त्यामुळे राज्यातील भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी अकोल्याबाबत कानाला हात लावला. त्यामुळेच अकोल्यात अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची, उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा रद्द झाल्याची माहिती आहे. असे असताना वंचित नेते प्रकाश आंबेडकरांनी यांनी मात्र एक पत्र काढून त्यांची थेट लढत भाजप उमदेवारासोबत असल्याचे जाहीर केले.

एमआयएमने वंचितला अकोल्यात पाठिंबा दिला. पण, एमआयएमचे अकोल्यात स्ट्राँग नेटवर्क नाही. अशावेळी मुस्लिमांची मते अकोल्यात निर्णायक ठरतील. ही मते काँग्रेसला मिळतात की वंचितला यावर अकोला लोकसभेचे गणित निश्चित होईल. वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडे त्यांचे कॅडर आणि संपुर्ण जिल्ह्यात नेटवर्क आहे. त्याचा फायदा त्यांना होत आहे.

amit Shah, nitin gadkari, yogi aditynath, narendra modi
Pankaja Munde News : 'जरांगेंवर टीका नाही, केली तर मागे घेत नाही, मी गोपीनाथ मुंडेंची औलाद'; पंकजांचा ललकार...

अकोल्यात दिग्गज नेत्यांच्या सभा नसल्याने निवडणुकीचा माहौल निर्माण करण्यात काँग्रेस आणि भाजपला म्हणावा तसा प्रचार करता येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे योगी यांची रद्द झालेली सभा याला काँग्रेस, शिवसेना (उबाठा) यांनी भांडवल करत अकोला भाजपच्या 'डी' झोन अर्थात डेंजर झोनमध्ये गेल्याचा दावा शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे. अकोल्यात भाजपला 'अच्छे दिन' नसल्याचा अहवाल केंद्र पातळीवर पोहाेचल्याचा दावा आ. देशमुख यांनी केला आहे.

शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी प्रचार सभेत केलेल्या दाव्यापूर्वीच अकोल्यात योगींच्या रद्द झालेल्या सभेची जोरदार चर्चा जनमानसात होती. नंतर प्रचार सभेत तो मुद्दा वापरला गेल्याचे चित्र आहे. मोठ्या नेत्यांच्या झालेल्या सभांचे राजकारण होतेच पण, न झालेल्या सभेचेदेखील राजकारण होऊ शकते, हे अकोला लोकसभा निवडणुकीत अधोरेखित होत आहे.

R

amit Shah, nitin gadkari, yogi aditynath, narendra modi
Sharad Pawar News : "कधी नेहरू, तर कधी राहुल गांधींवर टीका, पंतप्रधान म्हणून तुम्ही काय केलं?" पवारांचा मोदींना सवाल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com