Pune News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळा निर्णय घेत भाजप सोबत जाण्यास पसंती दिली. राज्य सरकारमध्ये सामील होत शिंदेंच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. अनेक आमदारदेखील अजित पवारांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सामील झाले. परंतु आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक गट नाराज झाल्याच्या बातम्या झळकल्या आहेत. त्यावर माध्यमांशी बोलताना अजित पवारांच्या पक्षातील नाराजीविषयी डॉ. अमोल कोल्हे यांनी भाष्य केले आहे.
डॉ. कोल्हे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, खरं तर हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत प्रश्न आहे. कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अशा प्रकारच्या नाराजी असणे स्वाभाविक आहे. कारण जे नेतृत्व एकेकाळी 23 जागांचे निर्णय घेऊ शकत होते, त्यांना अवघ्या आता चार जागा मिळतात. ही परिस्थिती लोकसभेला (LOKSABHA) असेल, तर विधानसभेला काय परिस्थिती असेल हा संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होणे स्वाभाविक आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्याचबरोबर महायुतीची खूप मोठी घसरण होणार आहे. सर्व्हेमध्येदेखील ज्या चार जागा अजितदादांना भाजपने (BJP) देऊ केल्या आहेत, त्या चारही जागा मिळत नसल्याचे चित्र सर्व्हेमधून समोर आले आहे. दरम्यान, ज्या जागा मिळाल्या आहेत त्या चार जागांवर एक घरात उमेदवारी द्यावी लागली तर एक पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना जागा लढवावी लागत आहे आणि उर्वरित दोन जागांवर उमेदवार आयात करावे लागले असल्याने पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होणे स्वाभाविक आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नाराजी अशी पक्षाच्या बाहेर येत असेल तर ही लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर होणारी विधानसभा निवडणुकीचे चित्र संभ्रमात असल्याच्या चर्चादेखील जोर धरू लागल्या आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर अजित पवार यांच्या मागे जातील, अशी चर्चा सुरुवातीच्या काळात होती.
मात्र कोल्हे यांनी ज्येष्ठ नेते शरद यांची साथ देत त्यांच्याबरोबर रहाण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर अजित पवार यांनी खासदार कोल्हे यांचा कडक शब्दांत समाचार घेण्यास सुरुवात केली होती. लोकसभेच्या निवडणुकीत खासदार कोल्हे यांना पाडणार म्हणजे पाडणारच, असा निर्धार अजितदादांनी केला आहे.
Edited By : Chaitanya Machale
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.