Beed Crime News : बीड हादरले! पोलिसाने धमकी देत खाली उतरवले अन् केला बलात्कार

Beed Police officer assaulting woma : पुण्यात काहीच दिवसांपूर्वी एका तरूणीवर स्वारगेट बस स्थानकात बलात्कार झाला होता. याचे अद्यापही पडसाद उमटत असतानाच आता बीडमधून आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे.
Rape Case
Rape Casesarkarnama
Published on
Updated on

Beed Crime : शनिवारी (ता.8) जगभरात जागतिक महिला दिन साजरा होत असतानाच बीडमध्ये पोलिस खात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथे एका पोलिस कर्मचाऱ्यानेच तरूणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे आता रक्षकच भक्षक बनले असून दादा मागायची कोणाकडे असा सवाल महिलावर्ग करताना दिसत आहे. तर तरूणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्या नराधमाला ताब्यात घेतले आहे. तर तरूणीला मेडिकलसाठी पाठवले आहे. ही घटना गेवराई तालुक्यातील पाटोदा येथे घडली असून आरोपी पोलिस कर्मचाऱ्याचे नाव ठाणे अमलदार उद्धव गडकर असे आहे. सध्या पोलिस तपास करत आहेत.

जागतिक महिला दिनीच्या औचित्यावर राज्यात नारी शक्तिचा जागर केला जात असतानाच बीडमध्ये पुण्यासारखी घटना घडली. येथे एका नराधमाने तरूणीवर पहाटे स्वारगेट बसस्थानकात उभ्या असणाऱ्या शिवशाही बसमध्ये बलात्कार केला. त्यानंतर त्या तरूणीने धाडस दाखवत तक्रार दिल्यानंतर ही घटना समोर आली. यानंतर राज्यात एकच संतापाची लाट उसळली होती. तर तपासादरम्यान तो नराधम पोलिसांचा ड्रेस वापरून अत्याचार करण्यासाठी सावज शोधत होता. अशी धक्कादायक माहिती उघड झाली होती.

पण आता बीडच्या या घटनेत पोलिसानेच तरूणीचे लचके बसमधून खाली उतरवून तोडले आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील पीडित तरूणी महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी पुण्याहून बीडला येत होती. यावेळी पाटोदा पोलीस ठाण्याचे अमलदार गडकर यांने पाटोदा स्टेट बँकेच्या बाजूला असलेल्या घरात नेऊन या तरूणीवर बलात्कार केला. धक्कादायकबाब म्हणजे या तरूणीला बसमधून उतवरुन आरोपीने तिच्यावर बलात्कार केला.

Rape Case
Beed : थेट वाल्मिक कराडशी पंगा, धमकी देत खंडणी वसुलीचा आरोप... कोण आहे शिवराज बांगर?

तर तरूणीने आरओरड करण्याचा प्रयत्न करताच चोरीचा खोटा गुन्हा दाखल करून आत टाकेन अशी धमकी देत गप्प करत बलात्कार केल्याची तक्रार त्या तरूणीने केली आहे. पीडितेच्या तक्रारीवरुन आरोपीला ताब्यात घेण्यात असून त्याचे नाव ठाणे अमलदार उद्धव गडकर असे आहे. ही घटना बीडमधील पाटोद्यात घडली. पुढील तपास सुरु आहे. पीडितेला वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आले आहे.

तर पीडित तरूणी आणि आरोपी पोलिस गडकर यांच्या ओळख होती. काही कारणास्तव पीडित तरूणी पाटोदा पोलीस ठाण्यात आली असता त्यांची ओळख झाली होती. या ओळखीचा गैर फायदा घेत त्याने त्या तरूणीचा नंबर मिळवला होता. तर आता संधीचा फायदा घेत आरोपीने महिलेला पाटोदा येथे बोलावून घेतले.

Rape Case
Beed crime news : 'खोक्या'कडून सुरेश धसांना डब्बे भर भरून हरणांचे मांस जायचे; मुंडेंच्या आरोपांनी खळबळ

तसेच तिला स्टेट बँकेच्या बाजूला असणाऱ्या घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. ही घटना शनिवारी (ता.8) दुपारी 1 च्या सुमारास घडली. यानंतर पाटोदा पोलीस स्टेशनममध्ये येऊन त्या तरूणीने आपली तक्रार दिली. तर कारवाईला सुरुवात होईपर्यंत ती तेथेच होती. यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी त्या तरूणीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. तसेच आरोपी उद्धव गडकरला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com