Lok Sabha Election Exit Poll: निकाल अवघ्या काही तासांवर 'एनडीए'बाबत राजकीय विश्लेषकाचा मोठा दावा

Hemant Desai News : निवडणूक निकालाला अवघे काही तास शिल्लक राहिले असतानाच राजकीय विश्लेषक हेमंत देसाईंचे मोठं विधान केलं असून थेट देशातील, राज्यातील आकडाच सांगितला आहे.
eknath shinde devendra fadnavis ajit pawar uddhav thackeray sharad pawar nana patole
eknath shinde devendra fadnavis ajit pawar uddhav thackeray sharad pawar nana patoleSarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 News : लोकसभा निवडणुकीसाठी देशात चुरशीने सात टप्प्यात मतदान झाले. जवळपास अडीच महिन्यापेक्षा अधिककाळ सुरु असलेला निवडणुकीचा रणसंग्राम सुरू होता. उद्या सकाळी मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

गेल्या काही दिवसापासून उत्सुकता लागलेल्या निवडणूक निकालाला अवघे काही तास शिल्लक राहिले असतानाच राजकीय विश्लेषक हेमंत देसाईंचे मोठं विधान केलं असून थेट देशातील, राज्यातील आकडाच सांगितला आहे.

दोन दिवसापासून पोल सुरु असल्याने सर्वच राजकीय मंडळींची धाकधूक वाढली आहे. या पोल्सवरून सत्ताधारी व विरोधक दावे-प्रतिदावे करीत आहेत. त्यामुळे निकालापूर्वीच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यात गेल्या निवडणुकीच्या तुलनेत कमी मतदान झाले. त्यामुळे निवडणूक निकालाची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.

देशभरात पार पडलेल्या निवडणुकीनंतर राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी मोठा दावा केला आहे. त्यांच्या मते देशात भाजपप्रणीत एनडीए (Bjp) आघाडीला बहुमत मिळणार आहे. देशात जवळपास 300-310 जागा मिळतील, असा अंदाज त्यांनी वर्तवला.

भाजपने ओरिसा, पश्चिम बंगालमध्ये केलेली कामगिरी निर्णयकी ठरली असून त्यासोबतच उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये कामगिरीत सातत्य ठेवले तर मित्र पक्षासोबत त्यांनी आंध्रप्रदेशात दमदार कामगिरी केली आहे.

त्यामुळे महाराष्ट्र्र, कर्नाटक व बिहारमध्ये भाजपचे थोडेफार नुकसान झाले तरी हे नुकसान त्यांनी भरून काढल्याने भाजपप्रणित एनडीए आघाडी सहज बहुमताचा आकडा पार करेल, असा अंदाज व्यक्त केला.

दुसरीकडे काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीला (Congress) गेल्या निवडणुकीच्या तुलनेत चांगल्या जागा मिळणार आहेत. काँग्रेस व मित्रपक्ष मिळून 190-200 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. काँग्रेसला काही राज्यात अपेक्षीत असलेला परफॉर्म करता आला नसल्याचा फटका त्यांना बसला असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.

eknath shinde devendra fadnavis ajit pawar uddhav thackeray sharad pawar nana patole
Latur Lok Sabha Constituency Analysis : विलासराव, निलंगेकर, चाकूरकरांना पराभवाची धूळ चारणाऱ्या लातूरकरांचा नवा खासदार कोण?

राज्यातील चित्र पाहता याठिकाणी महाविकास आघाडी (MVA) वरचढ ठरेल, असा अंदाज हेमंत देसाई यांनी वर्तविला आहे. 48 पैकी महाविकास आघाडीला 28 जागा मिळतील तर महायुतीला जवळपास 20 जागा मिळतील, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

राज्यात महायुतीच्या विरोधात वातावरण होते त्याचा फटका काही प्रमाणात सहन करावा लागला असून मतदाराना फोडाफोडीचे राजकारण पसंद पडले नसल्याचे त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाला 14 जागा मिळतील तर काँग्रेसला आठ तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाला सहा जागा मिळतील असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. महायुतीतीमधील भाजपला 15 जागा मिळतील तर शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळून पाच जागा मिळतील, असा अंदाज देसाई यांनी व्यक्त केला आहे.

eknath shinde devendra fadnavis ajit pawar uddhav thackeray sharad pawar nana patole
Jalna Loksabh Constituency : मतदारांचा उत्साह कोणाच्या पथ्यावर? दानवे की काळे?

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com