Jalna Loksabh Constituency : मतदारांचा उत्साह कोणाच्या पथ्यावर? दानवे की काळे?

Loksabha Election : जालना मतदारसंघातील मतदानावर मराठा आरक्षण हा मुद्दा प्रभाव टाकणार ठरेल, असे बोलले जाते.
Kalyan Kale, Raosaheb Danve
Kalyan Kale, Raosaheb DanveSarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election : लोकसभेच्या जालना मतदारसंघात मतदारांचा उत्साह दिसून आला. सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरूवात झाली तशी मतदान केंद्रावर गर्दी होती. ऐरवी दुपारी ब्रेक घेणाऱ्या मतदारांनी भर उन्हातही मतदान केले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत 58.85 टक्के मतदानाची नोंद झाली.आणखी दहा ते पंधरा टक्के मतदान वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मराठवाड्यात झालेल्या पहिल्या दोन टप्प्यात मतदानाची टक्केवारी घटल्याचे दिसून आले. पण तिसऱ्या आणि अंतिम टप्पात मात्र मतदारांचा उत्साह वाढलेला दिसला. महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे, महाविकास आघाडीचे डाॅ.कल्याण काळे Kalyan Kale यांच्यात इथे काटे की टक्कर आहे. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही लढत रंगतदार वळणावर पोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Kalyan Kale, Raosaheb Danve
Shivsena-AIMIM News : हात तोडण्याची भाषा अन् हातमिळवणी, इम्तियाज-दानवे समोरासमोर

रावसाहेब दानवे Raosaheb danve या मतदारसंघातून सलग सहाव्यांदा निवडून आलेले आहेत, तर कल्याण काळे याच मतदारसंघात दुसऱ्यांदा त्यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. जालना लोकसभा मतदारसंघातील मतदानावर मराठा आरक्षणाचा Maratha Reservation प्रभाव पडल्याचे बोलले जाते. मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू ठरलेले अंतरवाली सराटी हे गाव जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात येते. हा भाग जालना लोकसभा मतदारसंघात येत नसला तरी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची दिशा, सगळ्यात मोठी सभा याच जालन्यातून झाली. इथूनच आरक्षणाचा लढा मराठवाडा आणि राज्यभरात पोहचला. त्यामुळे जालना मतदारसंघातील मतदानावर मराठा आरक्षण हा मुद्दा प्रभाव टाकणार ठरेल, असे बोलले जाते.

अर्थात मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी कोणाला मतदान करा किंवा करू नका, असे आवाहन केले नाही. ज्यांनी समाजाला त्रास दिला,त्यांना पाडा, असा संदेश त्यांनी दिला होता. शेवटच्या टप्प्यातील जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या तीन मतदारसंघात या संदेशाने काम केल्याचे बोलले जाते. आता याचा फायदा कोणाला आणि फटका कोणाला हे चार जूनच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. मतदानात असलेला उत्साह ही उमेदवारांसाठी जमेची बाजू आहे.

रावसाहेब दानवे यांचे घर असलेल्या भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 65 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. या मतदारसंघाचे नेतृत्व भाजपचे आमदार संतोष दानवे करतात. त्या खालोखाल पैठणमध्ये 61.64 ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व शिवसेना शिंदे गटाचे मंत्री व छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे उमदेवार संदीपान भुमरे करतात तिथेही मतदारांचा चांगला प्रतिसाद असल्याचे दिसून आले आहे.

भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे व जालना लोकसभा मतदारंसघातील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार कल्याण काळे यांच्या फुलंब्री मतदारसंघात 58.62 टक्के मतदानाची नोद झाली आहे. मंत्री अब्दुल सत्तार आमदार असलेल्या सिल्लोड-सोयगांव विधानसभा मतदारसंघात 58.61 तर बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांच्या मतदारसंघात 58.3 टक्के मतदान झाले. काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांच्या जालना मतदारसंघात सर्वात कमी 51.36 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ असल्याने यात आणखी किती वाढ होते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

(Edited By Roshan More)

Kalyan Kale, Raosaheb Danve
Nagar South Loksabha Constituency : श्रीगोंदे व पारनेरने वाढवली धाकधूक; नगर आणि शेवगावला लागल्या रांगा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com