Poonam Mahajan : गोपीनाथ मुंडे यांच्या घात की अपघात?, पूनम महाजन यांचं मोठं विधान, म्हणाल्या, '...षडयंत्र'

Poonam Mahajan Gopinath Munde Pramod Mahajan : गोपीनाथ मुंडे हे 2014 ला बीडमधून निवडणूक लढवत होते. त्याच वेळी मी देखील निवडणूक लढत होते. त्यांना माझी काळजी होती, असे पूनम महाजन म्हणाल्या.
Poonam Mahajan Gopinath Munde
Poonam Mahajan Gopinath Mundesarkarnama
Published on
Updated on

Poonam Mahajan News : भाजपच्या माजी खासदार, प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांनी प्रमोद महाजन यांच्या हत्येमागे षडयंत्र असल्याचे म्हटले होते. गोपीनाथ मुंडे यांचा देखील अपघाती मृत्यू झाला होता.त्यामुळे त्याच्या मागे देखील षडयंत्र होते का? असा प्रश्न पूनम महाजन यांना 'साम टिव्ही'ने घेतलेल्या मुलाखतीमध्ये विचारण्यात आला.

या प्रश्नाला उत्तर देताना पूनम महाजन म्हणाल्या, गोपीनाथ मुंडे यांच्या जाण्यामागे षडयंत्र आहे, असे मला वाटत नाही. बाबा गेल्यानंतर मामा आहेत असे मला वाटत होते. माझ्या शपथविधीला ते असतील असे देखील मला वाटत होते. पण तीन तारखेला त्यांचे निधन झाले आणि चार तारखेला माझा शपथविधी झाला,असे देखील पूनम महाजन म्हणाल्या.

2014 ला ते बीडमधून निवडणूक लढत होते. त्याच वेळी मी देखील निवडणूक लढत होते. त्यांना माझी काळजी होती. त्यामुळे ते विचारत होते. पण मी त्यांना सांगितले काळजी करू नका मी जिंकेल, असे देखील पूनम महाजन म्हणाल्या.

Poonam Mahajan Gopinath Munde
Poonam Mahajan: निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच पूनम महाजनांनी वाढवलं भाजपचं टेन्शन; केला 'हा' गंभीर आरोप

तीन वर्षापूर्वीच बोलले...

पूनम महाजन यांनी निवडणुकीच्या काळात प्रमोद महाजन यांच्या हत्येप्रकरणात षडयंत्र असल्याचे बोलत असल्याचे म्हटले जात आहे, या प्रश्न पूनम म्हणाल्या की, मी या विषयावर तीन वर्षांपूर्वीच बोलले होते. त्यावेळी मीडियाने ते दाखवले नाही. मात्र, मी आत्ता यावर बोलून त्याचे निवडणूकीत काही प्लस मायनस होणार नाही.

प्रमोद महाजन यांच्य हत्येच्या षडयंत्राची चौकशी करण्याची मागणी गृहमंत्र्यांना पत्र लिहून करणार आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली तर प्रत्येक पक्षाचे त्याला समर्थनच असेल, असे पूनम महाजन म्हणाल्या.

नामंतरासाठी बाबा जेलमध्ये गेले

पूनम महाजन (Poonam Mahajan) म्हणाल्या, रामदास आठवले यांच्याशी गप्पा मारताना ते नेहमी सांगत असतात की मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्यासाठी जेलमध्ये जेणारे पहिली व्यक्ती प्रमोद महाजन होते.

Poonam Mahajan Gopinath Munde
Osmanabad Assembly constituency: उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती, महायुती सरकारने सोयाबीनचा भाव घसरवला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com