Prakash Ambedkar : सगळे म्हणतात संसदेत घुसखोरी करणाऱ्यांना शिक्षा द्या,पण प्रकाश आंबेडकर मात्र...

Lok Sabha Security Breach : नोकरी न मिळाल्याच्या नैराश्यातून केले कृत्य
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar sarkarnama
Published on
Updated on

Parliament Security Breach: संसदेत घुसखोरी करून तरुणांनी मोठा गोंधळ उडवून दिला. या तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे. या तरुणांना जास्तीत जास्त शिक्षा करण्याची मागणी होते आहे. मात्र, यावर नेमकी उलटी भुमिका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar )यांनी घेतली आहे. "संसदेत घुसणाऱ्या तरूणांनी सरकारी नोकरी न मिळाल्याच्या नैराश्यातून हे कृत्य केले आहे. त्यामुळे न्यायालयाने शिक्षा दिल्यानंतर सरकारने या तरूणांची शिक्षा माफ करावी." अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

घुसखोरी करणाऱ्या तरुण आणि एका महिलेने आपण केलेली कृती ही बेरोजगारीतून केली असल्याचे सांगितले.तर, खासदारांनी संसदेच्या सुरक्षेव्यवस्थेवर प्रश्न चिन्हा उपस्थित केले होते. त्यामुळे तातडीने सुरक्षारक्षकांना निलंबित करण्यात आले. लोकसभेची सुरक्षा भेदणाऱ्या तरुणांमध्ये लातुरमधील चाकूर तालुक्यातील झरी गावातील अमोल शिंदे याचा ही समावेश होता.

Prakash Ambedkar
Parliament Security Breach: संसदेत घुसखोरी करणाऱ्या अमोल शिंदेची बाजू असीम सरोदे कोर्टात मांडणार

सरकार नोकऱ्या देऊ शकले नाही. त्यामुळे तरुणांनी हे टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी कायदा मोडला हे खरे आहे. मात्र, त्यांना शिक्षा द्यायची की माफी हे सरकारने ठरवले पाहिजे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. संसदेची सुरक्षा व्यवस्था कमकुवत होती. संसदेसाठी विशेष सुरक्षा व्यवस्थेची आवश्यकता असताना ती दिल्ली पोलिसांकडे का दिलीय? जुनी उद्या आणखी काही घटना घडल्यास आश्चर्य वाटणार नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोणत्या घटनेला किती महत्व द्यायचं हे सरकारनं ठरवावं. त्यामुळे सरकारने या तरुणांना माफ करावे आणि हा विषय संपवावा, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. तसेच बच्चू कडूंनी प्रकाश आंबेडकर यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी केली होती. त्यावर बोलताना प्रकाश आंबेडकरांनी बच्चू कडूंचे आभार मानले. बच्चू कडू यांनी जरी ही इच्छा व्यक्त केली असली तरी शेवटी लोकशाहीत यासाठी लोकांचा आशीर्वाद आणि संख्याबळ महत्वाचे असते.असे मत प्रकाश आंबेडकर यांनी मांडले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com