Prakash Ambedkar News : राजकीय पंडित, ज्याेतिषांना मोदींनी झोपवलं; का हारलो याचा काँग्रेसने विचार करावा...

Assembly Election 2023 : वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर ; ...नाहीतर काहीतरी गडबड आहे.
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Prakash Ambedkar News : काल झालेल्या निवडणूक निकालांत चार राज्यांपैकी तीन राज्यांत भाजपने मुसंडी मारली. या निकालाने राजकीय पंडित, ज्याेतिषांना मोदींनी झोपवलं असल्याचे मत वंचित आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले, तर तुम्ही का हारलो याचा काँग्रेसने विचार करावा, असा सल्लाही त्यांनी काँग्रेसला दिला आहे.

माध्यमांमधून सांगितलेली भाजपच्या विरोधातील लाट ही बाब खोटी आहे, नाहीतर काहीतरी गडबड असल्याची शक्यताही त्यांनी या वेळी बोलून दाखविली. काल झालेल्या निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar म्हणाले, राजकीय पंडित, ज्याेतिषांना मोदींनी Modi झोपवलं आहे.

Prakash Ambedkar
Assembly Elections Vote Results 2023 : तीन राज्यं जिंकल्याने आता देशाच्या निम्म्याहून अधिक लोकसंख्येवर राज्य करणार भाजप

आश्चर्याची बाब म्हणजे सामाजिक समतोल राखणारे भाजपचे प्रवक्ते खरे ठरले आहेत. छत्तीसगडसारख्या आदिवासी राज्यात भाजपने चकित केले. निवडणुकांचे निकाल सरप्रायजिंग आहेत. माध्यमांमधून सांगितलेली भाजपच्या विरोधातील लाट ही बाब खोटी आहे, नाहीतर काहीतरी गडबड असल्याची शक्यता आहे. मात्र, निकाल मान्य केला पाहिजे.

छत्तीसगड, राजस्थात, तेलंगणा आणि मध्य प्रदेश राज्यांतील निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले. त्यामध्ये तेलंगणा राज्य वगळता तीन राज्यांत भाजपने मुसंडी मारली आहे. या निकालाने लोकांना बरंच काही शिकवलं आहे आणि त्यातून लोकांनी आणि राजकीय विश्लेषकांनी शिकवं अशी परिस्थिती आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे छत्तीसगड, राजस्थात आणि मध्य प्रदेश तीन राज्यांत भाजपने आघाडी घेतली असताना तेलंगणा राज्यात मात्र त्यांना यश मिळाले नाही. याचाही विचार केला पाहिजे. तुम्ही का हारलो याचा काँग्रेसने विचार करावा, असा सल्लाही प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला दिला आहे. या निवडणुका म्हणजे लोकसभेची सेमीफायनल आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मागच्या वेळी जी राज्यं भाजप हारले, त्या ठिकाणी आता ते जिंकले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुका रंजक होणार आहेत. याचा परिणाम इंडिया आघाडीवर होणार आहे. यामध्ये इंडिया आघाडी राहील की नाही. भाजप आणि एकनाथ शिंदे गट हे दोन पक्ष सोडून सर्वांनी आगामी निवडणुका बॅलेटवरती घेत नसाल तर आम्ही त्यात भागच घेत नाही, असे सांगण्याची धमक दाखविली पाहिजे, असे मत आंबेडकर यांनी बोलून दाखविले.

Edited By : Amol Sutar

Prakash Ambedkar
Nilanga News : 'हाता'च्या मदतीशिवाय 'कमळ' कसं फुलणार ? काका-पुतण्यामध्ये रंगला कलगीतुरा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com