Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांचे सरसंघचालक मोहन भागवतांना चॅलेंज; म्हणाले, 'तुम्ही लिहिलेले संविधान...'

Prakash Ambedkar : शिवाजी पार्कवरील सभेत प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकार आणि संघावर संविधान बदलाच्या चर्चेबाबत टीका केली. देश धार्मिक ध्रुवीकरणाकडे जात असल्याने भारताची जागतिक प्रतिमा खालावत असल्याचे त्यांनी म्हटले.
Prakash Ambedkar addressing the Vanchit Bahujan Aghadi rally in Mumbai, publicly challenging RSS Chief Mohan Bhagwat on the alleged Constitution change and demanding open debate on the RSS draft.
Prakash Ambedkar addressing the Vanchit Bahujan Aghadi rally in Mumbai, publicly challenging RSS Chief Mohan Bhagwat on the alleged Constitution change and demanding open debate on the RSS draft.Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : संविधान बदलाची चर्चा भाजप आणि संघ परिवाराकडून सुरू असल्याची टीका करण्यात येत आहे. मुंबई येथे शिवाजी पार्कवर वंचित बहुजन आघाडीची संविधान सन्मान महासभा पार पडली. यासभेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी थेट सरसंघचालक मोहन भागवत यांना आव्हान दिले.

आंबेडकर म्हणाले, 'संविधान बदलायचे म्हणून या देशातील वातावरण तापवले जातेय. मी मोहन भागवतला आव्हान करतो की, आत्ताच्या संविधानापेक्षा तुम्ही दाखल केलेल संविधान चांगले असेल तर त्या संविधानावर देशामध्ये चर्चेला सुरुवात करा. त्याची चर्चा होऊ द्या.'

1930 च्या दशकात आरएसएसचे कार्यकर्ते हिटलर आणि मुसोलिनी यांच्या भेटीस गेले होते, असे ऐतिहासिक पुरावे सांगतात. मग तुम्ही सांगा, हिटलरला आदर्श मानता का? मुसोलिनीचा मार्ग मान्य करता का? असा थेट सवाल आंबेडकरांनी भागवतांना आपल्या भाषणातून केला.

पुढे बोलताना ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी जगभर दौरे करत असले तरी भारतासाठी कोणताही देश पुढे येत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतावरील विश्वास कमी होत चालला आहे, कारण जगाला भारत आज धार्मिक विभाजनाच्या दिशेने जाताना दिसत आहे. लोकशाहीला मागे ढकलून हुकूमशाहीचा मार्ग स्वीकारला, तर जग आपल्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही.

Prakash Ambedkar addressing the Vanchit Bahujan Aghadi rally in Mumbai, publicly challenging RSS Chief Mohan Bhagwat on the alleged Constitution change and demanding open debate on the RSS draft.
Prakas Ambedkar News : सगळे पक्ष आरक्षणविरोधी, तुम्हाला `वंचित`शिवाय पर्याय नाही

पाकिस्तानचे उदाहरण देत त्यांनी सांगितले, धर्माधारित राष्ट्र किती अस्थिर असते. पाकिस्तानला धर्माच्या आधारावर स्वातंत्र्य मिळाले, पण केवळ 24 वर्षांत त्यांची फूट होऊन बांगलादेश निर्माण झाला. कारण धर्म राष्ट्राला एकत्र ठेवू शकत नाही. राष्ट्राला एकत्र ठेवतात ते समता, स्वातंत्र्य आणि बंधुता. ही मूलतत्त्वे हीच भारताची खरी ओळख आहे.

भाजपल लोकशाही संपवतोय...

भाजप आता देशात एकपक्षीय व्यवस्था निर्माण करत आहे. प्रादेशिक पक्ष संपवून लोकशाहीचे वैविध्य नष्ट केले जात आहे. जे संविधानवादी आहेत तेच राष्ट्रवादी. जे मनुवादी आहेत ते देशाचे विघटन करणारे आहेत, असे देखील ते म्हणाले.

आपण ठरवले पाहिजे की BJP–RSS ला मत देणार नाही. कारण जे तुमचे हक्क हिरावून घेत आहेत त्यांनाच तुम्ही सत्ता देणार का? तुमचे एक मत म्हणजे तुमचे स्वातंत्र्य सुरक्षित ठेवण्याची ताकद आहे, तसेच देशात विरोधी पक्षच अस्तित्वात नाही, कारण विरोधी पक्ष नकली प्रश्न उपस्थित करून एकप्रकारे सत्ताधाऱ्यांची मदतच करत आहे, असा हल्लाबोल देखील त्यांनी विरोधी पक्षांवर केला.

आरएसएसची नोंदणी का नाही?

देशातील प्रत्येक संस्था नोंदणीकृत असणे बंधनकारक आहे, मग RSS ची नोंदणी का नाही? औरंगाबाद कोर्टात तुमच्यावर केस आहे. नोंदणी नसलेल्या संघटनेला सरकारी सुरक्षा का दिली जाते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

राजा मतपेटीतून ठरतो. त्यामुळे या पुढच्या निवडणुकांमध्ये आपली ताकद दाखवा, असे आवाहन देखील वंचितच्या कार्यकर्त्यांना केले.

Prakash Ambedkar addressing the Vanchit Bahujan Aghadi rally in Mumbai, publicly challenging RSS Chief Mohan Bhagwat on the alleged Constitution change and demanding open debate on the RSS draft.
Raj Thackeray On Jitendra Singh : मुंबईत येऊन ललकारणाऱ्या मोदींच्या मंत्र्याला राज ठाकरेंनी ठणकावले, 'मळमळ पुन्हा एकदा...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com