Prakash Ambedkar : 'RSS ने अनुसूचित जातींमध्ये फूट पाडणे थांबवावे', प्रकाश आंबेडकरांचा इशारा

Prakash Ambedkar RSS : यावेळी समाज ना विचार करेल, ना काही पाहील, ना आंदोलनाची परवानगी घेईल, थेट आरएसएसच्या दरवाजासमोर पूर्ण ताकदीने धडक देईल, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar sarkarnama
Published on
Updated on

Prakash Ambedkar News : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) सडकून टीका करत अनुसूचित जातींमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न थांबवावा, असा निर्वाणीचा इशारा दिला आहे.

त्यांनी आपल्या ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवर केलेल्या पोस्टमधून आरएसएसवर कडक शब्दांत निशाणा साधला आहे.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, जर आरएसएसने अनुसूचित जातींमध्ये फूट पाडणे बंद केले नाही, तर यावेळी समाज ना विचार करेल, ना काही पाहील, ना आंदोलनाची परवानगी घेईल, थेट आरएसएसच्या दरवाजासमोर पूर्ण ताकदीने धडक देईल.

या आधी वंचित बहुजन आघाडीने नागपूर येथील संघ मुख्यलयावर (रेशीम बाग) मोर्चा काढला होता. या आंदोलनाचा संदर्भ देताना त्यांनी आरएसएसवर टीका केली. मागच्यावेळी नागपुरात आंदोलन केले होते, तेव्हा आरएसएसच्या लोकांना कार्यालय सोडून जावे लागले होते. यावेळी मात्र कार्यालयच बंद करून टाकू. तसेही ही संघटना नोंदणीकृत नाहीये, असेही त्यांनी सांगितले.

Prakash Ambedkar
Abhijeet Dipke : लाठीचार्ज, अश्रुधुराचा मारा करत विद्यार्थ्यांना उचलणाऱ्या पोलिसांवर अभिजित दिपकेंचा हल्लाबोल; 'RSS ची चड्डी...'

याचबरोबर आरएसएसशी संबंधित लोकांचा त्यांनी उल्लेख केला आहे. “तुमचे बाजारातील जे दुकानदार आहेत, त्यांना समाजातील लोक ओळखतात. त्यांच्या दारापर्यंतही समाजातील लोक जातील,” असा इशाराही ॲड. आंबेडकर यांनी दिला आहे.

आंबेडकर यांच्या या पोस्टमध्ये आरएसएसच्या भूमिकेवर थेट टीका करण्यात आली असून, अनुसूचित जातींमध्ये फूट पाडण्याच्या प्रयत्नांना विरोध करण्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. आंदोलनाबाबत कठोर भूमिका घेत त्यांनी दिलेल्या या इशाऱ्यामुळे महाराष्ट्रात राजकीय चर्चेला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Prakash Ambedkar
Anandraj Ambedkar : सरकार आमच्यातच वाद लावतंय; पण आम्ही ते होऊ देणार नाही : आनंदराज आंबेडकरांचा इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com