Anandraj Ambedkar : सरकार आमच्यातच वाद लावतंय; पण आम्ही ते होऊ देणार नाही : आनंदराज आंबेडकरांचा इशारा

SC Sub-categorization Issue : आनंदराज आंबेडकर यांनी राज्य सरकारवर समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा आरोप करत रिपब्लिकन सेना अशा प्रयत्नांना यशस्वी होऊ देणार नसल्याचा इशारा दिला.
Anandraj Ambedkar
Anandraj AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 27 July : सरकार महाराष्ट्रात कुणबी विरुद्ध मराठा, आदिवासी विरुद्ध धनगर असा वाद लावत आहे. तसाच वाद अनुसूचित जातीमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करत आहे, पण, आम्ही तो होऊ देणार नाही, सरकारचे हे मनसुबे आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी दिला आहे.

अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरणाच्या विरोधात मोर्चा काढण्यात येत आहे. त्या मोर्चासाठी सोलापुरात आलेले आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी उपवर्गीकरणाच्या विरोधामागील भूमिका स्पष्ट केली.

ते म्हणाले, अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरणविरोधात आज आम्ही सोलापुरात मोर्चा करतोय. या आधी परभणी, पिंपरी चिंचवड, लातूर, मुंबई अशा ठिकाणी मोर्चा झाला आहे. चिराय्या विरुद्ध आंध्र प्रदेश निकालात एससी समाज हा होमोजिनियस आहे, त्यामुळे यात कुठलेही उपवर्गीकरण करता येणार नाही, असे सांगितले आहे. सरकार जबरदस्तीने हे उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे.

सरकार आपला अजेंडा राबवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, तो बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या विरोधात आहे. सरकारने अनुसूचित जातीच्या आरक्षणात हस्तक्षेप करू नये. बदर कमिटी रद्द करण्यात यावी आणि उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मागणी आंबेडकर यांनी केली.

Anandraj Ambedkar
Shivsena UBT : ठाकरेंच्या आमदाराची भाजपशी जवळीक वाढली; आषाढीच्या धावपळीतही मुख्यमंत्र्यांनी दिला वेळ!

महाराष्ट्रात सध्या साडेतीन टक्केवाल्यांचे राज्य आहे. मनुवाद्यांच्या हाताला लागलेली काही मंडळी आहेत, ते दोन जातीमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अनुसूचित जातीमधील सर्व जाती एक आल्यामुळे त्यांचा मनसुबा आम्ही यशस्वी होऊ देणार नाही.

युती ही निवडणुकीपुरती

आमच्या सोबत मतांग, खाटीक समाजाचे लोकही आहेत. घटनेने 13 टक्के आरक्षण दिलेले आहे. सरकारने आमच्या अनुसचित जातीच्या आरक्षणात ढवळाढवळ करु नये. कोणतीही युती ही निवडणूक पुरती असते, आम्ही सत्तेत असतो, तर आज आमदार खासदार असतो, त्यामुळे आम्ही सत्तेत असल्याच्या चुकीच्या गोष्टी पसरवू नये, असे आवाहनही आनंदराज आंबेडकर यांनी केले.

ते म्हणाले, मनुवाद्यांच्या हाताला लागलेली काही मंडळी दोन जातींमध्ये वाद निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न करत आहे. काही मोजके लोक आहेत, त्यांना आम्ही आमच्यापासून दूर ठेवलंय. केंद्रीय मंत्री रामदास आठवले वगैरेचा संबंध नाही, त्यांच्यामुळे काही फरक पडणार नाही, त्यांची समजाशी नाळ तुटलेली आहे. आठवले उपवर्गीकरणाला समर्थन देतात आणि त्यांचे प्रदेशाध्यक्ष विरोध करतात. अशा गोष्टींमुळे कार्यकर्त्यांची गोची होते

कर्नाटकमध्ये उपवर्गीकरणाचा प्रयत्न झाला आहे. पण कोर्टाने त्याला स्थगिती दिली आहे. राज्यातही तसं झालं तर आम्ही रस्त्यावरही लढू आणि कायदेशीरही लढाई लढू. बाळासाहेब आंबेडकर हे उपवर्गीकराच्या विरोधात भूमिका का घेत नाहीत, हा प्रश्न त्यांना विचारा. भीमराव आंबेडकर आणि मी भूमिका घेतली आहे. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला आणि बाबासाहेब आंबेडकर आयकॉन झाले आहेत. हे पाहून काही मनुवादी शिक्षणातील आरक्षण संपवा, असं बोलतायत. मनुवाद्यांच्या खोट्या सोशल मीडिया अकाउंटवरून हे केलं जातं. सोशल मीडियावरून आरक्षणाचे लाभार्थीच हेच त्याला उत्तर देतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Anandraj Ambedkar
Eknath Shinde : इंदिरा गांधींच्या हत्येची आठवण करून देत एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींवर गंभीर आरोप : 'आपण दोन पंतप्रधान गमावलेत...'

ते म्हणाले, जे जे जनतेला त्रास देतील, त्यांना बाजूला केलं पाहिजे. या जनतेने दाखवून दिलंय देशात कोणतीच यंत्रणा सर्वश्रेष्ठ नाही. जनता सर्वश्रेष्ठ आहे, हे जनतेने आंदोलनाच्या माध्यमातून दाखवून दिलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com