Prithviraj Chavan ON CM Fadnavis : 'फडणवीसांच्या दावोस दौऱ्यावर टीका योग्य नाही पण...', काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्याने मांडली रोखठोक भूमिका

Devendra Fadnavis Over Davos Visit : महाराष्ट्राच्या बेरोजगार युवकांना इव्हेंट नकोत तर पारदर्शकता, उत्तरदायित्व व प्रत्यक्ष रोजगार हवे आहेत, असा टोला चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
Prithviraj Chavan Devendra Fadnavis
Prithviraj Chavan Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

Prithviraj Chavan News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच दावोस दौरा केला. या दौऱ्यात कोट्यावधींचे करार, एमओयू करण्यात आले. मात्र, भारतातील, महाराष्ट्रातील कंपन्याच परदेशात, दावोसमधून जाऊन फडणवीसांसोबत करार करत असल्याची टीका विरोधक करत आहेत. त्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे.

सोशल मीडियावर पोस्ट करत चव्हाण यांनी म्हटले आहे की,'महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या दाव्होस दौऱ्यावर टीका करणे योग्य नाही. जर खरोखर ३० लाख कोटींचे MoU झाले असतील, तर आंनदाची बाब आहे. राज्याच्या प्रगतीसाठी परकीय गुंतवणूक येणे आवश्यक आहे. पण मोठे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करणे योग्य नाही. कारण सत्य शेवटी बाहेर येतेच.'

'मागील दाव्होस दौऱ्यातील MoU पैकी महाराष्ट्रात किती उद्योग सुरू झाले? किती गुंतवणूक झाली? प्रत्यक्षात किती रोजगार निर्माण झाले? मोठे आकडे नव्हे, तर प्रत्यक्ष गुंतवणूक व त्यातून होणारी रोजगारनिर्मिती महत्त्वाची आहे.', असे देखील त्यांनी म्हटले आहे.

Prithviraj Chavan Devendra Fadnavis
Nagpur Politics : नागपूर महापालिका पराभवानंतर उद्धव सेनेचे मोठे ऑपरेशन; जिल्हाप्रमुख बदलला, शहर प्रमुखाला पक्षातून हाकलले

'आपल्याच राज्यातील कंपन्यावरोबर दाव्होस मध्ये MoU करण्याबद्दल कर्नाटक सरकारच्या उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांचे निरीक्षण महत्वाचे आहे. ते म्हणतात की आम्ही दाव्होससारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर कर्नाटक किंवा भारतीय कंपन्यांशी MoU करत नाही तर फक्त परकीय गुंतवणुकदारांशी करार करतो.

म्हणूनच कर्नाटकात परकीय उद्योग येतात आणि कर्नाटकाचे दरडोई उत्पन्न महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. अडाणी आणि लोढा यांच्या सारख्या स्थानिक कंपन्याबरोबर डाव्होसमधेये करार करणे हा एक क्रूर विनोद आहे.', असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

इव्हेंट नकोत रोजगार हवा

महाराष्ट्राच्या बेरोजगार युवकांना इव्हेंट नकोत तर पारदर्शकता, उत्तरदायित्व व प्रत्यक्ष रोजगार हवे आहेत. आत्तापर्यंतच्या डाव्होस मध्ये घोषणा केलेल्या MoU वर आणि त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात किती मोठे परकीय उद्योग सुरू झाले यावर मुख्यमंत्री श्वेतपत्रिका काढतील का? असा सवाल देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

Prithviraj Chavan Devendra Fadnavis
Nashik Mayor Politics: महापौरपदाच्या आडून नाशिकमध्ये विधानसभेच्या उमेदवारीची फिल्डिंग पुन्हा एकदा चर्चेत, भाजप आमदार झाल्या सावध!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com