

Professor Recruitment : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (एनईपी २०२०) प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनानं महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्न मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापक संवर्गातील ५ हजार १२ रिक्त पदं भरली जाणार आहेत.
राज्य शासनानं सहाय्यक प्राध्यापकपदांच्या भरतीला मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णयही जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महाविद्यालयांमधली पदं भरली जात नव्हती. पण आता शासनानं भरती प्रक्रियेला मान्यता दिल्यामुळं आणि ही तब्बल ५००० हून अधिक पदं असल्यानं यापदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी ही मोठी बातमी ठरली आहे.
दरम्यान, शासन निर्णयात म्हटलं की, राज्यातील सार्वजनिक विद्यापीठाशी संलग्नित उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महिविद्यांमधील १ ऑक्टोबर २०२५ रोजी विद्यार्थी संख्येनुसार, विद्यार्थी संख्येनुसार परिगणीत केलेल्या कार्यभारानुसार सहाय्यक प्राध्यापक संवर्गात एकूण रिक्त असलेल्या ५०१२ रिक्त पदांच्या पदभरतीस मान्यता देण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.