Maharashtr Assembly Election 2024 : 'या' मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी-महायुतीचे ठरेना! इच्छुक उमेदवार गॅसवर

Maharashtra Assembly Election : तीन मतदारसंघांमध्ये भाजपच्या इच्छुकांचा जीव टांगणीला, आघाडीचे इच्छुक अद्यापही गॅसवर...
Pune Vidhansabha Election
Pune Vidhansabha Election Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहे. भाजपने 99 उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या आत्तापर्यंत एक किंवा दोन याद्या जाहीर झाल्या आहेत. काँग्रेसने देखील आज दुसरी उमेदवारी यादी जाहीर केली. मात्र या उमेदवारी यादीत पुण्यातील उमेदवारी बाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

महाविकास आघाडीकडून आतापर्यंत फक्त तीन विधानसभा मतदारसंघांच्या (Vidhan Sabha Constituency) उमेदवारी बाबत घोषणा करण्यात आली आहे. यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून हडपसर आणि वडगाव शेरीचा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. तर काँग्रेसने कसबा विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा विद्यमान आमदारांना उमेदवारी दिली आहे. खडकवासला, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट पर्वती आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर होणे अद्याप बाकी आहे.

सध्या परिस्थिती पाहता शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट ही जागा जवळपास काँग्रेसला येईस असं निश्चित मानलं जात आहे. तर पर्वती विधानसभा मतदारसंघासाठी देखील काँग्रेस आग्रही आहे. त्यामुळे या तीन विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस इच्छुक देव पाण्यात ठेवून उमेदवारी जाहीर होण्याची प्रतीक्षा करत आहेत. अशातच दुसऱ्या यादीमध्ये देखील या इच्छुकांची निराशा झाल्याचे पाहायला मिळत आहे.

कोथरूड विधानसभा मतदारसंघ हा (Shivsena) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे राहण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातून पृथ्वीराज सुतार आणि चंद्रकांत मोकाटे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मात्र ऐन वेळेस इन्कमिंग करून या ठिकाणी उमेदवार दिला जाण्याची शक्यता असल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे.

Pune Vidhansabha Election
Shivsena UBT Second List : शिवसेनेचे 15 शिलेदार ठरले! दुसऱ्या यादीत 'या' उमेदवारांना संधी

तर दुसरीकडे भाजपने देखील पहिल्या यादीमध्ये पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी तीन ठिकाणी उमेदवार जाहीर केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने देखील हडपसर आणि वडगाव शेरीमध्ये (Vadgaon Sheri) विद्यमान आमदारांना उमेदवारी दिली आहे. मात्र अद्याप कसबा, खडकवासला आणि पुणे कॅन्टोन्मेंट बाबत भाजपने सस्पेन्स कायम ठेवला आहे. भाजपने या विधानसभा मतदारसंघात अध्यप उमेदवार न दिल्याने ऐनवेळी भाजपकडून उलट फेर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे इच्छुकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.

Pune Vidhansabha Election
Congress Second candidate list : अखेर काँग्रेसचं ठरलं! दुसऱ्या यादीत 'या' उमेदवारांना संधी

बंडखोरीच्या शक्यतेने वादाचे मतदारसंघ शेवटी ?

पुणे शहरातील अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारीसाठी अंतर्गत चुरस पाहायला मिळत आहे. त्यामुळे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बंडखोरीची सर्वाधिक शक्यता असलेल्या विधानसभा मतदारसंघाबाबत पक्षाकडून निर्णय राखून ठेवला असल्याचं बोललं जात आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास काही तास शिल्लक असताना उमेदवारी जाहीर केल्यास बंडखोरांना इतर पक्षाशी संधान साधणं सोपं जाणार नाही. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी जाहीर न करण्याची स्ट्रॅटजी पक्षाकडून अवलंबण्यात आली असल्याचं चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com