Shivsena UBT Second List : शिवसेनेचे 15 शिलेदार ठरले! दुसऱ्या यादीत 'या' उमेदवारांना संधी

Thackeray Group Candidate List : याआधी 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आज शिवसेनेच्या 15 उमेदवारांची यादी केली आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray Group Candidate List : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत. त्यातच आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. याआधी 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर आज शिवसेनेच्या 15 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये धुळे शहर, चोपडा, जळगाव शहर, बुलढाणा, दिग्रस, हिंगोली, देवळाली, श्रीगोंदा, कणकवली, भायखळा, शिवडी, वडाळा, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, देवळाली, परतूर या मतदारसंघाचा सहभाग आहे.

शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर, ठाकरेंचे हे 15 शिलेदार ठरले!

  1. शिवडीमधून अजय चौधरी,

  2. धुळे शहर-अनिल गोटे,

  3. चोपडा-राजू तडवी,

  4. जळगाव शहर-जयश्री सुनील महाजन,

  5. बुलढाणा-जयश्री शेळके,

  6. दिग्रस- पवन श्यामलाल जयस्वाल,

  7. हिंगोली-रूपाली राजेश पाटील,

  8. परतूर-आसाराम बोराडे,

  9. देवळाली-योगेश घोलप,

  10. कल्याण पश्चिम-सचिन बासरे,

  11. कल्याण पूर्व-धनंजय बोडारे,

  12. वडाळा-श्रद्धा श्रीधर जाधव,

  13. भायखळा-मनोज जामसुतकर,

  14. श्रीगोंदा-अनुराधा राजेंद्र नागावडे,

  15. कणकवली- संदेश भास्कर पारकर

Uddhav Thackeray
Aaditya Thackeray : मागील 5 वर्षात आदित्य ठाकरेंच्या मालमत्तेत 'इतक्या' कोटींची वाढ, एकूण संपत्ती किती?

महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढ्यावरून बरचं मतभेद होते. त्यामुळे हा तिढा सोडवण्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांचा अनेक बैठका पार पडल्या. त्यावरून 90-90-90 असा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने भायखळा मतदारसंघात शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांच्याविरोधात मनोज जामसुतकर यांना उतरवलं आहे. वडाळ्यातून माजी महापौर श्रद्धा जाधव, तर शिवडीतून विधिमंडळ गटनेते अजय चौधरी यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर राष्ट्रवादीतून चार दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केलेल्या अनुराधा नागवडे यांना श्रीगोंद्यातून उमेदवारी देण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com