

BJP Mumbai Municipal Corporation : भाजपवर दबाव आणण्यासाठी एकनाथ शिंदे शिवसेने मुंबई महापालिकेत स्वतंत्र गटनोंदणीचा निर्णय घेतला. त्यासाठी एकनाथ शिंदे शिवसेनेने काल दिवसभर नाट्यमय घडामोडी घडल्या.
पण गटनोंदणी झाली नाही. आता भाजप-एकनाथ शिंदे शिवसेना युतीने एकत्रित, गटनोंदणीचा निर्णय घेतला असून, गुरूवारी ही नोंदणी होईल. यात व्हीप बंधनकारक असणार आहे.
मुंबई महापालिकेत भाजप-एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेना युतीचा सत्ता स्थापनेचा तिढा जवळपास सुटत चालला आहे. वैधानिक आणि विशेष समित्यांमध्ये निर्माण झालेली कोंडी आता सुटणार आहे. विरोधी पक्षांच्या नगरसेवकांची संख्या समान म्हणजेच, आठ-आठ इतकी होत असली, तरी स्थायी समिती अध्यक्षांना निर्णायक मताचा अधिकार असल्याने सत्ताधारी पक्षाला एक मताधिक्य मिळणार आहे.
दरम्यान, येत्या गुरुवारी भाजप (BJP) व एकनाथ शिंदे शिवसेना कोकण भवनला एकत्रित नोंदणी करणार आहे. या गटनोंदणीनंतर महापौर निवडणूक आणि विविध समित्यांमधील चित्र स्पष्ट होणार आहे; मात्र व्हीप बंधनकारक राहणार आहे.
काँग्रेस, AIMIM, मनसे, सपाच्या दोन नगरसेवकांपैकी एका नगरसेवकांनी नोंदणी केली. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षानेही नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे; मात्र अजूनही भाजप, एकनाथ शिंदे शिवसेनेने नोंदणी केली नसल्याने महापौर निवडणुकीची तारीख ठरलेली नाही. आता दोन्ही पक्ष महायुती म्हणून एकत्र नोंदणी करणार आहे.
एकनाथ शिंदे शिवसेनेचे नगरसेवकांना भाजपच्या व्हीपचे पालन करणे अनिवार्य राहणार आहे. एखाद्या नगरसेवकाने व्हीपच्या विरोधात जाऊन मतदान किंवा निर्णय घेतला, तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. तक्रार दाखल झाल्यानंतर पालिका आयुक्तांना संबंधित नगरसेवकांच्या निलंबनाचा अधिकार आहे. मात्र, तक्रार दाखल न झाल्यास कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
समित्यांमधील तांत्रिक अडचणी लक्षात घेता भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेना एकत्रित कोकण आयुक्तांकडे नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीच्या नावाने नोंदणी केल्याने सर्व प्रश्न सुटतील, अशी प्रतिक्रिया शिंदेसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.
दरम्यान, एकनाथ शिंदे शिवसेनेने काल गटनोंदणीसाठी सर्व नगरसेवकांना एकत्रित बोलावलं होते. भाजपला सोडून स्वतंत्र गटनोंदणीचा निर्णय, यावर एकत्र येण्याचा आदेश, ठिकाणी बदलली, आदेश बदलले अन् अखेर गटनोंदणीचा निर्णय रद्द झाला. शिंदेसेनेतील या नाट्यमय घडामोडीनंतर, नेमकी गटनोंदणी कशामुळे रद्द झाली हे समजू शकलं नाही. मात्र या प्रकाराची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे अखिल चित्रे यांनी चांगलीच खिल्ली उडवली. दिल्लीश्वरांसमोर मुजरा घालतात. दिल्लेश्वरांनी डोळे वटारल्यानंतर गटनोंदणीचा कार्यक्रमच रद्द झाल्याचा टोला अखिल चित्रेंनी लगावला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.