देशात पुणे जिल्हा बँकेची आघाडी : शेतकऱ्यांना पाच लाखांचे कर्ज शून्य टक्के दराने

उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज ही घोषणा केली.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्यावतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पाच लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजाने दिले जाणार आहे. हा निर्णय बॅंकेच्या आज झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने घेण्यात आला.येत्या रब्बी हंगामापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज ही घोषणा केली.

कर्ज पुरवठ्याच्या या प्रस्तावाला सहकार विभागाची मान्यता घेऊन अंमलजबावणी करण्यात येणार आहे. पाच लाख रूपये शून्य टक्के व्याजाने देणारी पुणे जिल्हा बँक देशातील एकमेव बँक ठरणार आहे. तीन लाखांहून अधिक आणि पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या तीन लाखांपुढील रकमेचे म्हणजे उर्वरित दोन लाख रुपयांचे व्याज जिल्हा बॅक भरणार आहे.

Ajit Pawar
निवडणुकांपुरतं लक्ष घालून सत्ता मिळत नाही; दरेकरांचा खासदार राऊतांना चिमटा

गेल्या बारा वर्षांपासून पुणे व सातारा या दोन जिल्हा बॅंका शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांसाठी तीन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजाने देण्यात येत आहे. या दोन्ही बॅंकांचा शून्य टक्के व्याजाचा हा पॅटर्न राज्यभर चालू करण्याचा निर्णय राज्य सरकारने चालू वर्षीच्या खरीप हंगामापासून घेतला आहे. राज्य सरकारने या निर्णयाची चालू वर्षीच्या खरीप हंगामापासून अंमलबजावणी सुरु केली आहे.यामुळे चालू वर्षीच्या खरीप हंगामात राज्यातील सर्वच पात्र शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजाने देण्यात आले आहे.

बॅंकेची १०४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बॅंकेच्या अध्यक्ष रमेश थोरात यांच्या अध्यक्षतेखाली आज ऑनलाइन पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे हे या सभेला ऑनलाइन उपस्थित होते.

जिल्हा बॅक ही शेतकऱ्यांची बॅक आहे. या बॅंकेचा खरा मालक हा शेतकरी आहे. शून्य टक्के पीक कर्ज वाटपाची मर्यादा वाढवावी, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. त्यांची मागणी पूर्ण करणे हे बॅंकेचे कर्तव्य आहे. ते कर्तव्य आज पार पाडले आहे. यामुळे अतिवृष्टी आणि अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. पालकमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे, असे बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी सांगितले.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com