Radhakrishna Vikhe News : शिर्डीतील आठवलेंच्या उमेदवारीचा मार्ग विखे पाटलांनी केला मोकळा ? बघा नेमकं काय घडलं?

Ahmednagar Politics : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिर्डी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Radhakrishna Vikhe News
Radhakrishna Vikhe NewsSarkarnama

Shirdi: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना शिर्डी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माझी राज्यसभेच्या खासदारकीची मुदत २०२६ पर्यंत आहे. पण, मला जर संधी मिळाली तर पुन्हा शिर्डीतून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. त्यासंदर्भात आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही आठवले म्हणाले आहेत.

याचदरम्यान, आता भाजप नेते व राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या विधानामुळे आठवलेंचा शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीचा मार्ग मोकळा करुन दिल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे.

शिर्डीत रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने शिर्डीत (Shirdi) आलेल्या रामदास आठवले (Ramdas Athawale)यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावर भाजपचे नेते व मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी मोठं विधान केलं आहे. ते जसे तुमचे नेते आहेत तसे आमचेही नेते आहेत. आठवले जो आदेश देतील तो शिरसावंद्य मानून आम्ही काम करू असं विखे पाटील म्हणाले आहेत.

Radhakrishna Vikhe News
RPI Convention in Shirdi : ‘अशा लोकांमुळेच पार्टीचा सत्यानाश झालाय’; घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याला आठवलेंनी झाप झापले

सत्तेच्या स्पर्धेत किती आले आणि...

राधाकृष्ण विखे पाटलां(Radhakrishna Vikhe Patil)नी शिर्डीतील रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) अधिवेशनाला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी आठवलेंच्या शैलीत तुफान फटकेबाजी केली. विखे पाटील म्हणाले,मध्यंतरी अनेक पक्ष वेगवेगळ्या कारणांनी एनडीएमधून बाहेर पडले. मात्र, दुसऱ्या बाजूला रामदास आठवले ठामपणे भाजपसोबत उभे राहिले. सत्तेच्या स्पर्धेत किती आले आणि किती गेले. भाजपसोबत राहिले फक्त रामदास आठवले शिवशक्ती - भिमशक्ती याची ताकद साऱ्यांना दाखवू आणि २०२४ ला मविआचा पूर्ण सफाया करू विखे पाटील म्हणाले.

आठवलेंची चिंता करू नये, त्यासाठी आम्ही समर्थ...

रामदास आठवले अनेक वर्ष केंद्रात मंत्री आहेत मात्र अद्याप त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही. कार्यकर्त्यांनी आठवले साहेबांची चिंता करू नये, ती चिंता करायला आम्ही समर्थ आहोत. ते जसे तुमचे नेते आहेत तसे आमचेही नेते आहेत. आठवले साहेब जो आदेश देतील तो शिरसावंध मानून आम्ही काम करू असे विखे पाटील रिपाई कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले.

Radhakrishna Vikhe News
Patan News : सायरन वाजला की, लोक म्हणतात खोकेवाला आला : अजित पवारांचे शंभूराज देसाईंवर टीकास्त्र

आठवले काय म्हणाले होते?

रामदास आठवले यांनी माझी राज्यसभेच्या खासदारकीची मुदत २०२६ पर्यंत आहे. पण, मला शिर्डीतून लढण्याची संधी मिळाली तर माझी निवडणूक लढविण्याची इच्छा आहे असं विधान केलं होतं. तसेच नगरचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत माझं बोलणं झालं आहे. तसेच, इतर नेत्यांशीही चर्चा केली आहे. दिल्लीतही मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी बोलणार आहे असंही ते म्हणाले होते.

लोकसभा निवडणुकीची मोर्चेबांधीसाठी रिपब्लिकन पक्षाचे अधिवेशन शिर्डीत आयोजित करण्यात आलेले नाही. शिर्डी हे पवित्र ठिकाण असून महाराष्ट्रातील मध्यवर्ती ठिकाण आहे. ही गोष्ट खरी आहे की २००९ च्या लोकसभा निवडणुकीत मी शिर्डीत हरलो होतो. सध्या मी राज्यसभेवर आहे. राज्यसभेच्या खासदारकीची मुदत २०२६ पर्यंत आहे. पण, मला शिर्डीतून लढण्याची संधी मिळाली तर माझी निवडणूक लढविण्याची इच्छा आहे.

Radhakrishna Vikhe News
Rahul Gandhi Passport : राहुल गांधींना मिळालं नवं पासपोर्ट; अमेरिका दौऱ्याच्या उड्डाणासाठी सज्ज..

आंबेडकरांना ऑफर...

रामदास आठवलेंनी वंचितच्या प्रकाश आंबेडकांना पुन्हा एकदा भाजप ऑफर दिली आहे. आठवले म्हणाले, आंबेडकर आमचे नेते आहेत. मात्र, रिपाई ज्यांच्या बाजूने असते त्यांनाच सत्ता मिळते. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी माझ्यासोबत यावे मी त्यांना भाजपकडे घेऊन जातो. आपण दोघे मिळून भाजप आणि नरेंद्र मोदींसोबत राहू. तर उद्धव ठाकरेंनी देखील काँग्रेस राष्ट्रवादी सोबत राहू नये, ते कसे आहेत मला माहित आहे असं आठवले म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com