Ajit Pawar On Shambhuraj Desai: सायरन वाजला की, लोक म्हणतात खोकेवाला आला : अजित पवारांचे शंभूराज देसाईंवर टीकास्त्र

Ajit pawar News: पाटणला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा गुढे फाटा (ता. पाटण) येथील श्री गणेश मंगल कार्यालयात झाला. यावेळी अजित पवार यांनी मंत्री देसाई यांचे नाव न घेता टोले लगावले.
Shambhuraj Desai, Ajit Pawar
Shambhuraj Desai, Ajit Pawarsarkarnama

-राजेश पाटील

Debewadi News : ‘बारक्या शेंबड्या पोरालाही आता पन्नास खोके- एकदम ओके कळायला लागलं आहे. तुमच्या इथं तर सायरन वॉय वॉय वॉय करायला लागला की लोकं म्हणतायंत ते बघ पन्नास खोकेवाला चाललाय, बैलपोळ्याला बैलाच्या अंगावरही पन्नास खोके- एकदम ओके लिहिले जातेयं. हे आम्ही सांगितले नव्हते, लोकांपर्यंतच ते पोचलंय,’ असा टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे नाव न घेता लगावला.

पाटण मतदारसंघातील Patan राष्ट्रवादी काँग्रेसच्या NCP कार्यकर्त्यांचा मेळावा गुढे फाटा (ता. पाटण) येथील श्री गणेश मंगल कार्यालयात झाला. यावेळी अजित पवार Ajit Pawar यांनी मंत्री देसाई यांचे नाव न घेता भाषणात अप्रत्यक्षपणे अनेक टोले लगावले.

श्री. पवार म्हणाले, ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला न्याय व आधार देण्यासाठी शिवसेना उभी केली, वाढवली. साधे-साधे कार्यकर्ते मोठे केले. मात्र, जी लोकं त्यांच्या जिवावर मोठी झाली, त्यांनीच त्यांच्या मुलाकडील शिवसेना काढून घेतली. असा काय चमत्कार तिथे झाला की आमदार, खासदारांना बाजूला जावे लागले? अशी गद्दारी फार काळ चालत नाही.

कर्नाटकात जे बाजूला गेले त्यांना जनतेने पाडले आहे. आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीत ज्या पद्धतीने जागा वाटप होईल त्या पद्धतीने तुम्हाला इमाने इतबारे काम करावेच लागेल. १९९९ च्या निवडणुकीत सातारा जिल्ह्याने, पाटण तालुक्याने राष्ट्रवादीला मोठी ताकद दिली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षानेही तालुक्याला भरभरून दिले.

Shambhuraj Desai, Ajit Pawar
Satara NCP News : राष्ट्रवादी अंतर्गत मतभेद; औद्योगिक सेलच्या जिल्हाध्यक्षाचा राजीनामा

मात्र, सोसायट्या आपल्या असताना आणि ग्रामपंचायतीमध्येही आपण तुल्यबळ असताना आपली पाटणची हक्काची बाजार समिती का गेली? याचे आत्मचिंतन या मेळाव्याच्या निमित्ताने करा. नुसत्या शिट्ट्या आणि टाळ्या वाजवून काही होणार नाही. आपण कुठे कमी पडलो, कुठे लक्ष्मीदर्शन झाले, याचा शोध घेऊन पुढे काय खबरदारी घ्यायची ते बघा.

पाडापाडी, जिरवा-जिरवी राष्ट्रवादीत खपवून घेतली जाणार नाही. जित्याची खोड जाणार नसेल तर मोठे ऑपरेशन करावे लागेल. पाटण तालुक्यात वन्य प्राण्यांकडून शेतीचे प्रचंड नुकसान सुरू असून, शेतकऱ्यांना त्याची भरीव भरपाई मिळण्यासाठी आम्ही सरकारला वेगळे धोरण आणि निर्णय घ्यायला लावू.’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com