Rajura Constituency Dispute: राहुल गांधींचा राजूरा मतदारसंघात 'मतचोरी'चा झाल्याचा गंभीर आरोप; निवडणूक अधिकाऱ्यांची धक्कादायक माहिती

Rajura Assembly constituency : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मतचोरी या मुद्द्यावरून केंद्रीय निवडणूक आयोग आणि सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघातील 6850 मतं वाढवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
Election Commission
Election CommissionSarkarnama
Published on
Updated on

Chandrapur News : संसदेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मतचोरीच्या मुद्द्यावरून केंद्रीय निवडणूक आयोग आणि सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार देवराव भोळे हे व्होट चोरी करून निवडून आल्याचा आरोप गंभीर आरोप केला. आता याच आरोपांनंतर राज्य निवडणूक आयोगानं पत्रकाद्वारे मोठा खुलासा केला आहे.

राज्य निवडणूक आयोगानं शुक्रवारी(ता.19) प्रसिध्द केलेल्या पत्रकात राजुरा विधानसभा मतदारसंघातील बनावट मतदार नोंदणी प्रकरणाबाबत वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्यांच्या अनुषंगाने स्पष्टीकरण दिलं आहे. या पत्रकाद्वारे चंद्रपूर (Chandrapur) जिल्हाधिकारी कार्यालयानं महत्त्वाच्या बाबी निदर्शनास आणल्याची माहिती पत्रकाद्वारे दिली आहे.

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी "प्रशासनाने स्वत:हून व वेळेवर करण्यात आलेल्या कारवाईमुळे राजुरा विधानसभा मतदारसंघातील बनावट मतदार नोंदणी रोखली गेल्याचा दावा केला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी राजूरा विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी कार्यालयात दि. 1 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर 2024 या कालावधीत एकूण 7,592 नवीन मतदार नोंदणीसाठी अर्ज प्राप्त झाले होते असं म्हटलं आहे. तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (BLO) सदर अर्जांची तपासणी करण्यात आली असता त्यांना अर्जामध्ये काही त्रुटी निदर्शनास आल्याचं समोर आल्याचंही नमूद केलं आहे.

या पत्रकात अर्जदार दिलेल्या पत्त्यावर वास्तव्यास नसणे, अर्जदार अस्तित्वात नसणे,आवश्यक छायाचित्रे व पुरावे जोडलेले नसणे, या त्रुटींमुळे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणीअंती सदर 7592 अर्जांपैकी 6861 अर्ज अवैध ठरविण्यात आल्याचं सांगितलं आहे. या अर्जांची मतदारयादीत नोंद करण्यात आलेली निर्वाळाही दिला आहे.

Election Commission
Beed OBC Morcha: 'आष्टीचा जब्या विधानसभेला मुंडेंकडे परत येईल...'; ओबीसी मोर्चातून सुरेश धसांबाबत मोठा दावा

या प्रकरणाची चंद्रपूर जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी त्याचवेळेस गंभीर दखल घेवून मतदारनोंदणी अधिकारी व उपविभागीय अधिकारी, राजुरा यांना सर्वच अर्जांची सखोल चौकशी करण्याचे व लोकप्रतिनिधित्व कायदा 1950 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अंतर्गत आवश्यक ती गुन्हेगारी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते, असंही पत्रकात सांगितलं आहे.

या निर्देशांच्या अनुषंगाने राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्र.629/2024 नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस विभागामार्फत करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयाव्दारे स्वत:हून व वेळेवर केलेल्या कारवाईमुळे 6,861 बनावट अर्ज रद्द होवून संबंधित नावांचा 70, राजुरा विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत समावेश होऊ शकला नसल्याचा खुलासाही करण्यात आला आहे.

Election Commission
Election Commission: एकीकडे राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं वादळ; तिकडे निवडणूक आयोगाची सर्वात मोठी कारवाई; राजकीय पक्षांमध्ये खळबळ

मतदार नोंदणी अधिकारी व उपविभागीय अधिकारी कार्यालय, राजुरा यांनी दक्षता व वेळेवर घेतलेल्या तात्काळ कारवाईमुळे 70 - राजुरा विधानसभा मतदारसंघातील बनावट मतदार नोंदणीचे प्रयत्न यशस्वीरित्या रोखण्यात आल्याची माहिती या पत्राद्वारे देण्यात आली आहे.

राहुल गांधींचा आरोप काय..?

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा मतचोरी या मुद्द्यावरून केंद्रीय निवडणूक आयोग आणि सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघातील 6850 मतं वाढवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

यावेळी राहुल गांधींनी अनेक पुरावे दाखवले, शिवाय आयोगाला आता सबळ पुरावे दिले आहेत. त्यामुळे त्यांनी कारवाई करावी. अन्यथा ते मत चोरांना संरक्षण देत आहेत, असं समजू, असंही म्हटलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com