Rahul Narwekar News : अर्ज दाखल करताच राहुल नार्वेकरांचे मोठे विधान; म्हणाले, 'विरोधी पक्षनेत्याबाबतचा निर्णय...'

Political News : अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सोमवारी पार पडणार आहे. एकमेव अर्ज असल्याने राहुल नार्वेकरांच्या नावाची घोषणा होणार आहे. त्यातच प्रसार माध्यमाशी बोलताना राहुल नार्वेकर यांनी मोठे विधान केले आहे.
Rahul Narwekar
Rahul NarwekarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा अध्यक्षपदी भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे. महाविकास आघाडीकडून कोणीही उमेदवारी अर्ज भरला नाही. सोमवारी अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार आहे. एकमेव अर्ज असल्याने राहुल नार्वेकरांच्या नावाची घोषणा होणार आहे. त्यातच प्रसार माध्यमाशी बोलताना राहुल नार्वेकर यांनी मोठे विधान केले आहे. (Rahul Narwekar News )

सलग दुसऱ्यावेळी राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले आणि त्यानंतर भाजपबरोबर जात सरकार स्थापन केले. यानंतर विधानसभा अध्यक्षपद हे भाजपने त्यांच्याकडे घेतले होते. यावेळी भाजपकडून (Bjp) आमदार राहुल नार्वेकर यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांच्याकडे विधानसभेचे अध्यक्षपद जाणार आहे. फक्त सोमवारी त्यांच्या नावाच्या घोषणेची औपचारिकता बाकी आहे.

Rahul Narwekar
Sharad Pawar: मारकडवाडीत शरद पवार कडाडले, 'बॅलेटवर मतदान घ्या, निवडणूक पद्धत बदला' VIDEO पाहा

मी सर्वांचे आभार मानतो. कुठल्याही गोष्टीची जबाबदारी दिली जाते तेव्हा मेरीटवर दिली जाते आणि त्यातून माझी निवड झाली आहे. लोकशाहीवर विश्वास नाही म्हणून विरोधकांकडून आंदोलन केले जात आहे. विरोधात निकाल आता तेव्हा आयोगावर खापर फोडले जात आहे. संविधानाने दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आणि याची काळजी घेणं गरजेचं आहे. माझ्यावर देखील टीका झालेल्या आहेत. या टीका व्यतिरिक्त त्यांनी काही केले नाही. मी उद्यापासून विधानसभा अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडेल, तेव्हा सर्वांची साथ लाभेल, असे मत राहुल नार्वेकर यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना व्यक्त केले.

Rahul Narwekar
Markadwadi Voting : मी आमदारकीचा राजीनामा देतो, ‘बॅलेट’वर माळशिरसची पोटनिवडणूक घ्या; जानकरांचे निवडणूक आयोगाला चॅलेंज

कोणताही पक्षपात न करता निर्णय घेऊ. मला आज कुठल्याही विषयावर राजकीय भाष्य करायचे नाही. जनतेने आपल्या मॅन्डेटवरुन दाखवून दिलेले आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेता कोण असेल यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांचा अधिकार असतो. नियमात ज्या गोष्टी असतील त्याद्वारे गोष्टी होत असतात. माझ्याकडे गोष्टी आल्यास आम्ही विचार करुन निर्णय घेऊ. 288 आमदारांना न्याय दिला नाही तर जनतेबरोबर अन्याय होतोय असे वाटेल, असेही नार्वेकर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

Rahul Narwekar
Markadwadi Voting : उत्तमराव, माझ्या परवानगीशिवाय आमदारकीचा राजीनामा देऊ नका; जयंत पाटलांची सक्त ताकीद

संसदीय लोकशाहीसाठी फार महत्त्वाचे आहे, सर्वांना न्याय देणे. माझ्या कार्यकाळात सर्वाधिक लक्षवेधी मांडल्या गेल्या आहेत. डिजिटलायझेशन देखील सर्वाधिक माझ्या काळात झाले आहे. अडीच वर्षात सकारात्मक काम झाले आणि त्यादृष्टीने पुढील पाच वर्ष देखील प्रयत्न असेल. सेंन्ट्रल व्हिस्टा संदर्भात लवकरच विचार करत नव्या विधान भवनासंदर्भात निर्णय विचाराधीन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Rahul Narwekar
Sharad Pawar : इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्याची क्षमता कोणाकडे ? शरद पवारांनी थेट नावच सांगितले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com