Rahuri By-Election : राहुरी पोटनिवडणूकीत बिनविरोध नाहीच! 'वंचित'ने जाहीर केला उमेदवार

VBA candidate Anil Jadhav : वंचित बहुजन आघाडीने राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याचे मार्ग बंद झाले आहेत.
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Rahuri By-Election : राहुरी विधानभेच्या पाथर्डी आणि नगर या विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी अहिल्यानगर जिल्हा कार्यकारिणीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नगर दक्षिण व उत्तर जिल्ह्यांची संयुक्त बैठक घेऊन अनिल भिकाजी जाधव या आदिवासी तरुण कार्यकर्त्याला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

या बैठकीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी एकमुखाने हा निर्णय घेतला. अनिल जाधव हे गोरगरीब, कष्टकरी आणि शोषित घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देणारे, तडफदार व अनुभवी कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना विधानसभेत पाठवण्यासाठी उमेदवारी देण्यात आल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले.

याबाबत माहिती देताना राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी सांगितले की, “आजपर्यंत या राहुरी मतदारसंघात प्रस्थापितांना उमेदवारी देण्याची परंपरा राहिली आहे. मात्र संविधान जिवंत ठेवण्यासाठी आणि जातीवादी मानसिकतेला पराभूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने एका संघर्षशील कार्यकर्त्याला संधी दिली आहे.”

तसेच, मतदारसंघातील जनतेने एकदिलाने काम करून अनिल जाधव यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Prakash Ambedkar
Sunetra Pawar News : सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन; म्हणाल्या, 'बारामती पोटनिवडणुकीसाठी...'

काँग्रेस देखील मैदानात

काँग्रेसने देखील राहुरी तसेच बारामतीमध्ये विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे काँग्रेस देखील उमेदवार देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे हे देखील निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com