MP Dhairyashil Patil: खासदाराच्या 'होममिनिस्टर'साठी भाजप-राष्ट्रवादींचे कार्यकर्ते एकवटले! ZP साठी सुधागडमध्ये मोर्चेबांधणी

Former ZP President Neelima Patil Files Nomination for ZP Election:भाजप जिल्हाध्यक्ष तथा खासदार धैर्यशील पाटील यांच्या पत्नी असल्याने ही निवडणूक खासदारांच्या प्रतिष्ठेचा विषय ठरली आहे. भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते तसेच कार्यकर्ते नीलिमा पाटील यांच्या विजयासाठी एकवटले आहेत.
Raigad politics  ZP Election
Raigad politics ZP ElectionSarkarnama
Published on
Updated on

अमित गवळे

पाली : जिल्हा परिषद निवडणुकीत आमदार-खासदार यांच्या कुटुंबातील व्यक्ती पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे दिसत आहे. सुधागड तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे.

माजी जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. नीलिमा धैर्यशील पाटील यांनी जांभूळपाडा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बुधवारी (ता. 21) पाली येथे मोठ्या शक्तीप्रदर्शनासह त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दीपा भोसले यांच्याकडे हा अर्ज सुपूर्द केला.

सुधागड तालुक्यात सध्या भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची युती आहे. ॲड. नीलिमा पाटील या स्वतः जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आहेत. भाजप जिल्हाध्यक्ष तथा खासदार धैर्यशील पाटील यांच्या पत्नी असल्याने ही निवडणूक खासदारांच्या प्रतिष्ठेचा विषय ठरली आहे. भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते तसेच कार्यकर्ते नीलिमा पाटील यांच्या विजयासाठी एकवटले आहेत. निवडणुकीच्या मैदानात त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

या निवडणुकीत सत्तेतील भाजप-राष्ट्रवादी युती विरोधात मनसे आणि वंचित बहुजन आघाडी वगळता इतर सर्व प्रमुख पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे जांभूळपाडा मतदारसंघातील ही लढाई अत्यंत चुरशीची होणार असल्याचे चित्र दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश व राज्याने विकासाचा आलेख उंचावला आहे. जनता या विकासाला साथ देत भाजपला पुन्हा कौल देईल आणि या निवडणुकीतही भाजप आपले वर्चस्व प्रस्थापित करेल," असा विश्वास खासदार धैर्यशील पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

Raigad politics  ZP Election
Dhanorkar Vs Wadettiwar: धानोरकर-वडेट्टीवार वाद चिघळला! कुठलाच नेता पक्षाचा मालक नसतो...

उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष खासदार धैर्यशील पाटील, नेते प्रकाश देसाई, गीता पालरेचा, ज्योत्स्ना देसाई, सतीश देसाई, जिल्हा उपाध्यक्ष आलाप मेहता, अशोक कांबळे, सुधागड तालुका अध्यक्ष श्रीकांत ठोंबरे, विठ्ठल सिंदकर, आरिफ मणियार, मनोहर नाना देशमुख, ॲड. सुभाष पाटील आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com