Dhanorkar Vs Wadettiwar: धानोरकर-वडेट्टीवार वाद चिघळला! कुठलाच नेता पक्षाचा मालक नसतो...

Pratibha Dhanorkar Vs Vijay Wadettiwar News: चंद्रपूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यात वाद उफाळून आला असून काँग्रेसच्या रणनीतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Pratibha Dhanorkar Vs Vijay Wadettiwar News
Pratibha Dhanorkar Vs Vijay Wadettiwar NewsSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: चंद्रपूर महापालिकेच्या निवडणुकीत निवडून काँग्रेस नगरसेवकांच्या पळवापळवीवरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद चांगलाच टोकाला पोहचला आहे. काँग्रेसच्या नगरसेवकांना उचलून नेण्याची काय गरज असा सवाल करून धानोरकर यांनी वडेट्टीवारांच्या निष्ठेवर शंका व्यक्त केली होती.

आज त्याला वडेट्टीवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. कुठलाच नेता पक्षाचा मालक नसतो. स्वतःला मालक समजणाऱ्या नेत्याचे कार्यकर्त्यांनी थोबाड रंगवले पाहिजे, असे आवाहन केल्याने हा वाद आता चांगलाच भडकणार असल्याचे दिसते.

वडेट्टीवार म्हणाले, मी काही नगरसेवकांना उचलून आणले नाही. त्यांना घ्यायलाही गेले नव्हतो. ते सर्व इच्छेने माझ्याकडे आले . दुसरीकडे खासदारांचे कार्यकर्तेच हात पकडून पकडून नगरसेवकांना घेऊन गेले. कोण कोणाला घेऊन गेले हे नगरसेवकांना वन टू वन विचारावे. त्यांचे म्हणणे एकून घ्यावे. कोणी कोणाला मालक समजू नये असा टोलाही त्यांनी खासदारांना लगावला.

नगरसेवक व कार्यकर्त्यांना अन्याय होणार नाही याची जबाबदारी नेत्याची असतो. नेते इकडे तिकडे भटकत असतात. कार्यकर्ता कुठे जात नसतो. आज प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ नागपूरला येणार आहेत. त्यात तोडगा काढला जाईल. चंद्रपूर महापालिकेत सत्तास्थापनेसाठी आमच्यासोबत आणखी चार ते आठ नगरसेवक इतर पक्षातील यायला तयार आहेत. चंद्रपूरमध्ये काँग्रेसचाच महापौर बसणार असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला.

या वादामुळे चंद्रपूरमधील एकाही कार्यकर्त्याने राजीनामा दिलेला नाही. खासदारांकडे असलेले तीन चार नगरसेवक हे भाजपातून आलेले आहेत. मला भाजपची बी टीम असे खासदारांनी म्हटले आहे. मात्र महापालिकेच्या निकालातून कोण कोणाची टीम आहे हे सिद्ध झाले आहे. कोण कोणाच्या विरोधात बोलले, कोणी तोंड शिवून ठेवले होते हे चंद्रपूरच्या जनतेला माहीत आहे.

Pratibha Dhanorkar Vs Vijay Wadettiwar News
BMC Mayor Election: शिंदेंनी खेळलं ‘इमोशनल कार्ड’; बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षांत शिवसेनेचाच महापौर हवा! राजकारणात खळबळ

काँग्रेसने आधी मलाच लोकसभेची उमेदवारी दिली होती. मी लढणार नव्हतो. त्यामुळे मुलगी शिवानीसाठी उमेदवारी मागितली होती. त्यावेळी प्रतिभा धानोरकर यांचा पक्षात उदयसुद्धा झाला नव्हता. या वादाची सुरुवात कुठून झाली आणि कोणामुळे झाली हे चंद्रपूरच्या जनतेला चांगलेच माहीत असल्याचा टोलाही वडेट्टीवारांनी खासदारांना लगावला.

माणसे येतात जातात. मृत अवस्थेत असलेल्या काँग्रेस पक्षाला मी जिवंत केले. चंद्रपूर जिल्हा बँक कोणामुळे भाजपच्या ताब्यात गेली हे चंद्रपूरची जनता बघत आहे. मला वाद वाढवायचा नाही. महापालिकेत खासदारांनी उमेदवारी दिली ते पडले? ते का निवडून येऊ शकले नाही ? याचे उत्तर धानोरकर यांनी द्यावे असे सांगून वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com