राज ठाकरेंकडून पक्षात 'स्वच्छता' मोहिम; पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी

राज ठाकरे (Raj Thackeray) आज औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर आहेत
 Raj Thackeray .jpg
Raj Thackeray .jpg

Sarkarnama

Published on
Updated on

मुंबई : ११ डिसेंबर रोजी समुद्र किनारा स्वच्छता मोहिम अभियान यशस्वी झाल्यानंतर मनसेने (MNS) आता पक्षात स्वच्छता मोहिम सुरु केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून राज ठाकरे यांनी काही पदाधिकाऱ्यांची तडकाफडकी उचलबांगडी केली आहे. मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनिमित्त राज ठाकरे (Raj Thackeray) आज औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर आहेत, यावेळी त्यांनी काही पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकासाठी मनसेने तयारी सुरु केली आहे. या तयारीचा भाग म्हणून राज ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांची औरंगाबादमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. आज सकाळी सुभेदारी विश्राम गृहातून राज ठाकरे कायकर्ता मेळाव्यासाठी सप्तपदी मंगल कार्यालयाकडे दाखल झाले. याठिकाणी त्यांनी तडकाफडकी औरंगाबाद मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे (Suhas Dasharathe) यांच्यासह मनसे शहर अध्यक्ष सतनाम गुलाती (Satnam Gulati) यांची पद काढून घेतली.

 Raj Thackeray .jpg
भाजपच्या १२ आमदारांचे हिवाळी अधिवेशन हुकणार : अध्यक्षपदाची निवडणूक मविआसाठी सोपी

राज ठाकरेंच्या दौऱ्यातच झालेल्या या कारवाईनंतर दशरथे समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. सुहास दाशरथे यापुर्वी शिवसेनेत होते. मात्र त्यांना महत्त्वाचे पद न मिळाल्याने त्यांनी गतवर्षी मनसेत प्रवेश केला होता. मात्र इथेही त्यांची उपेक्षाच झाली आहे. मनसेतील गटबाजीमुळे काही दिवसांपासून औरंगाबादमध्ये (Aurangabad) वाद पाहायला मिळत होता. हा वाद मिटवण्यासाठी राज ठाकरेंनी दशरथे यांच्यावर गच्छंतीची कारवाई केली आहे.

 Raj Thackeray .jpg
चंद्रशेखर बावनकुळे पुन्हा आमदार : महाविकास आघाडीची मते फोडली

आज औरंगाबादला मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडल्यानंतर १६ डिसेंबरला राज ठाकरे पुण्यात पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. तर, कोकणातील पदाधिकाऱ्यांची बैठक निश्चित आहे, मात्र अद्याप तारीख ठरलेली नाही. तसेच उत्तर महाराष्ट्राची बैठक जळगावला आणि विदर्भातील अमरावती, नागपूर विभागाचीही बैठक होणार आहे. मात्र या बैठकांच्याही तारखा ठरलेल्या नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com