Raj Thackeray News : राज ठाकरे गुढीपाडवा मेळाव्यात करणार मोठी घोषणा; सोशल मीडियावर टिझरची चर्चा

Mns News : गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार? याची उत्सुकता असतानाच मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर एक टीझर शेअर करण्यात आला आहे.
raj thackeray
raj thackeray sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी काळात लवकरच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होतील असे गृहीत धरून तयारी सुरु करण्यात आली आहे. सर्वच पक्ष महापालिका निवडणुकांच्या कामाला लागले आहेत. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील तयारीला लागली आहे. छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर यंदाही गुढीपाडवा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार? याची उत्सुकता असतानाच मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर एक टीझर शेअर करण्यात आला आहे. त्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मनसेने शेअर केलेल्या या व्हिडीओत राज ठाकरेंच्या नुकत्याच पार पडलेल्या वर्धापन दिनाच्या भाषणाचे काही मुद्दे ऐकायला मिळत आहेत. “निछड्या छातीचा मराठी अभिमान”, “अभेद्य एकजूट” असे काही शब्दही पाहायला मिळत आहे. तसेच या भाषणादरम्यान त्यांनी मी येत्या ३० तारखेला बोलणार आहे, जल्लोषात, गुलाल उधळत सर्वांनी शिवतीर्थावर यावे, अशी मी विनंती करतो, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

raj thackeray
Bhaskar Khatgaonkar : अजितदादांच्या राष्ट्रवादीत दाखल होताच खतगावकरांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, 'लोकसभेला चव्हाणांच्या विरोधात...'

आगामी काळात राज्यातील महापलिका निवडणुका होत आहेत. सर्वांचे लक्ष मुंबईतील पालिका निवडणुकीकडे लागले आहे. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरेंनी महापालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे या गुढीपाडवा मेळाव्यात मोठी घोषणा करणार आहेत.

raj thackeray
Shivraj Patil : काँग्रेसने भरभरून दिलेल्या चाकूरकरांची वाजपेयींनंतर आता मोदींशीही जवळीक; राजकारणापलीकडील 'मैत्री' की..?

मनसेने या गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर एक टीझर शेअर केला आहे. मनसेने त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक मिनिटाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत गुढीपाडवा मेळावा 2025 आणि MNS Adhikrut असे नमूद करण्यात आले आहे. त्यामध्ये या गुढीपाडव्याला महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची गुढी उभारु!! असे आवाहन या व्हिडीओतून करण्यात आले.

raj thackeray
ShivSena vs NCP : इथं एकच शेठ, भरतशेठ! सुनील तटकरेंच्या राजकारणाला मंत्री गोगावलेंनी ललकारलं

चिंचवडमध्ये मनसेचा 19 वा वर्धापन दिन सोहळा पार पडला. त्यावेळी राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मी 30 मार्चला बोलणार, असे सांगितले होते. आता गुढीपाडवा मेळाव्याला फक्त काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या मेळाव्याच्या निमित्ताने राज ठाकरे नेमके काय बोलणार, याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. त्यासोबतच यावेळी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कोणती मोठी घोषणा करणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

raj thackeray
Eknath Shinde Controversy : 'ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी...', एकनाथ शिंदेंवर वादग्रस्त गाणं, शिवसैनिक आक्रमक; स्टुडिओ फोडलं, कुणाल कामरावर गुन्हा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com