ShivSena vs NCP : इथं एकच शेठ, भरतशेठ! सुनील तटकरेंच्या राजकारणाला मंत्री गोगावलेंनी ललकारलं

Raigad Snehal Jagtap Ajit Pawar NCP Sunil Tatkare ShivSena Minister Bharat Gogawale Maharashtra politics : रायगडमधील स्नेहल जगताप यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनील तटकरे यांच्या उपस्थित केलेल्या प्रवेशावर शिवसेना मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली.
Sunil Tatkare Bharat Gogawale
Sunil Tatkare Bharat GogawaleSarkarnama
Published on
Updated on

Raigad Politics : रायगडच्या राजकारणात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विस्तव देखील जाईनासा झाला आहे. पालकमंत्री पदाचा तिढा देखील अजून सुटलेला नाही. तोच आता, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पुन्हा शिवसेना मंत्री भरतशेठ गोगावले यांना डिवचलं आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षातील स्नेहल जगताप यांना राष्ट्रवादीत प्रवेश देत, आज रायगडमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावर शिवसेना मंत्री भरतशेठ गोगावले यांनी इथं एकच शेठ, भरतशेठ!, अशी प्रतिक्रिया देत, राजकीय संघर्ष कायम राहणार असा अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.

रायगडच्या महाडमधील स्नेहल जगताप यांनी आज अजितदादांच्या राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केला. विधानसभा 2024 निवडणूक त्यांनी भरतशेठ गोगावलेंविरुद्ध लढली होती. तत्पूर्वी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थित स्नेहल जगताप आणि त्यांच्या कुटुंबियांची बैठक झाली. या बैठकीत बरचं काही राजकीय घडल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीचा तपशील जरी समोर आला नसला, तरी ही तटकरे यांची जगताप कुटुंबियांशी जवळपास दोन तास बैठक झाल्याचे सांगितले जाते.

Sunil Tatkare Bharat Gogawale
Nagpur Riots : नागपूर दंगलीमागे मालेगाव 'कनेक्शन'? एकनाथ खडसेंचा गृहखात्याच्या अपयशावर हल्लाबोल

या बैठकीनंतर आज स्नेहल जगताप यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत, सुनील तटकरे यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश केला. सुनील तटकरे यांनी देखील यावेळी महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडले. पण, महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर शिवसेनेचे मंत्री भरतशेठ गोगावले (Bharat Gogawale) यांनी या प्रवेशावर आपली प्रतिक्रिया दिली.

Sunil Tatkare Bharat Gogawale
Pratap Patil Chikhlikar News : अजून मी भाजपाला हात घातलेला नाही! चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना सूचक इशारा!

भरतशेठ गोगावले म्हणाले, "आम्हाला संघर्ष नवा नाही. त्यांनी प्रवेश केला असला, तरी मतदार संघात संघर्ष होणार नाही. मागच्या वेळेला आमच्या विरोधात सर्व एकत्र होते. संघर्षाला आम्ही सामोरे गेलो. आमच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलं. तुम्ही सर्व एकत्र आलात तरी इथं एकच शेठ, भरतशेठ!"

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार संघर्ष आहे. शिवसेना मंत्री भरतशेठ गोगावले यांनी पालकमंत्रिपदावर दावा केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अदिती तटकरे यांना संधी दिली. त्यावरून महायुतीमधील एकनाथ शिंदे यांची शिवसेना कमालीची नाराजी व्यक्त केली. यानंतर फडणवीस यांनी रायगडसह नाशिक जिल्ह्यामधील पालकमंत्रिपदाच्या नावाला स्थगिती दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्यंतरी रायगड दौऱ्यावर होते. त्यावेळी या वादावर तोडगा निघेल, अशी घडामोड झाली होती. अदिती तटकरे, एकनाथ शिंदे, भरत गोगावले यांना एकत्र घेत एकाच वाहनातून प्रवास केला होता. परंतु तोडगा निघाला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com