Raj Thackeray Video : राज ठाकरेंचे वरळीत 40 मिनिटांचे भाषण पण एकादही घेतले नाही आदित्य ठाकरेंचे नाव; उद्धव ठाकरेंचा उल्लेखही...

. Raj Thackeray Worli Rally MNS Aditya Thackeray :हा देश सर्वांचा आहे हे मला मान्य आहे. पण या देशात कोणी कुठेही जाऊ शकते हे मला मान्य नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
Raj Thackeray
Raj Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Raj Thackeray News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या मुंबईत आज (गुरुवार) दोन जाहीर सभा झाल्या. पहिली सभा घाटकोपरमध्ये झाल्यानंतर राज ठाकरेंनी मनसेचे वरळी मतदारसंघातील उमेदवार संदीप देशपांडे यांच्यासाठी जाहीर सभा घेतली. वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या विरोधात संदीप देशपांडे लढत आहेत. त्यामुळे राज काय बोलणार याकडे लक्ष होते.

वरळीतील आपल्या 40 मिनिटांच्या भाषणात राज यांनी एकदाही आदित्य ठाकरेंवर टीका केली नाही किंवा त्यांचे साधे नाव देखील घेतले नाही.

आदित्य ठाकरेंचा उल्लेख आपल्या भाषणात न करणाऱ्या राज यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख फक्त दोनदा आपल्या भाषणात केला. उद्धव ठाकरे यांचे सरकार आल्यानंतर पहिले काय झाले असेल तर त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या नावा पुढील हिंदुहृदयसम्राट उल्लेख काढला, असे राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray
Dhanjay Munde : 'तुमचे राष्ट्रीय नेते अद्याप अविवाहितच'; धनंजय मुंडेंची आघाडीच्या उमेदवारावर खोचक टीका

हा देश सर्वांचा आहे हे मला मान्य आहे. पण या देशात कोणी कुठेही जाऊ शकते हे मला मान्य नाही.कारण या देशाचा कायदा आहे की तुम्हांला एका शहरात जायचं आहे तर पोलिसांना आधी सांगाव लागतं. की मी इकडे राहतो इकडे माझ काम आहे पण सगळे कायदे धाब्यावर बसवले जात आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

माहीममध्ये उद्धव ठाकरे सभा नाही

माहीम मतदारसंघामध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणूक लढवत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महेश सावंत उमेदवार आहेत. मात्र, माहीम मतदारसंघामध्ये आपण सभा घेणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. माहीम हा शिवसेचा आपला बालेकिल्ला असल्याने तेथे सभा घेणार नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

48 तासांत महाराष्ट्र साफ करेल

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हणाले, माझा पोलिसांवर मला 100 % विश्वास आहे. सत्ता माझ्या हातात दिली ना तर या पोलिसांना 48 तास देईल की हा महाराष्ट्र साफ करून द्या. त्यांना सगळं माहीत आहे पण काही करत नाही.कारण यांनी काही केल तर बळी यांचा जाईल. का तर योग्य भूमिका घेत होते म्हणून.

Raj Thackeray
Tuljapur Assembly Constituency : तामलवाडीत एमआयडीसी उभारण्याची प्रक्रिया सुरू; कोट्यावधीचे उद्योग येणार!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com