Rajendra Hagwane News : वैष्णवी हगवणेच्या आत्महत्ये प्रकरणात फरार झालेला राजेंद्र हगवणे आणि त्याचा पुत्र सुशील हगवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेनंतर राजेंद्र हगवणे सात दिवस कोठे फरार होता याची नवनवीन माहिती समोर येत आहे. या माहितीमध्ये राजेंद्र हगवणे यांचे कर्नाटक कनेक्शन समोर आले आहे.
राजेंद्र हगवणे हे फरार झाल्यानंतर कोल्हापूरजवळ महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर असलेल्या हेरिटेज रिसाॅर्टमध्ये गेले होते. 19 ते 21 मे दरम्यान ते याच रिसाॅर्टमध्ये मुक्कामी होते. विशेष म्हणजे त्यांची येथे राहण्याची व्यवस्था कर्नाटकचे काँग्रेसचे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रितम याने केली होती.
कर्नाटक सीमेवरील हेरिटेज रिसाॅर्टमध्ये राजेंद्र हगवणे राहत असलेल्या रुम प्रितम पाटील याच्या नावावर बुक होत्या. राजेंद्र यांच्यासोबत त्यांचे दोन मित्र देखील येथे राहण्यासाठी होते. राजेंद्र हगवणे 19 मे रोजी रात्री एकच्या सुमारास या रिसाॅर्टवर आले होते. त्यांची येथे राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था प्रितम पाटील यानेच केली होती.
प्रितम पाटील हा घोड्यांचा शैकीन आहे. त्याच ग्रुपमधून राजेंद्र हगवणे यांची आणि त्याची ओळख झाली असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. दरम्यान, माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी याबाबत त्यांना काही माहिती नसल्याची मीडियाशी बोलताना सांगितले. राजेंद्र हगवणे यांना आपल्या मुलाने मदत केल्याविषयी देखील ते अनभिज्ञ असल्याचे त्यांनी सांगितले.
वैष्णवीच्या आत्महत्येनंतर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे फरार झाले काही काळ ते मावळातील फाॅर्महाऊसवर गेले. तेथून आळंदीतील लाॅजवर देखील त्यांनी मुक्काम केला. पोलिसांनी केलेल्या तपासात थार, इंडेव्हर, आणि बलेनो अशा आलिशान गाड्यांमधून त्यांनी प्रवास केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.