Mumbai News : राज्यसभेचा उमेदवारी देताना महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस गट अजित पवार यांनी इतर पक्षांना धक्का देत राज्यसभेचे उमेदवारी दिली. भाजपने काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांना तर शिवसेना शिंदे गटाने काँग्रेसमधून सेनेत आलेल्या मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसपण त्याच प्रमाणे इतर पक्षाला धक्का देण्याचा प्रयत्न फसल्याचे पुढे आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून एक नेता येणार होता. त्यांनी येण्याचे आश्वासन दिले होते मात्र 'तो' नेता न आल्याने अचानक प्रफुल पटेलांना तीन वर्षांची टर्म शिल्लक असताना उमेदवारी दिली असल्याचे समजते.
प्रफुल पटेल यांची राज्यसभेची टर्म मे 2027 मध्ये संपणार आहे. मात्र, त्यापूर्वीच तीन वर्षे आधी प्रफुल पटेल हे राजीनामा देऊन पुन्हा अर्ज भरणार आहेत. काही तांत्रिक मुद्दे असल्याने हा निर्णय घेत आहोत, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.
कार्यकाळ संपण्याच्या तब्बल तीन वर्ष आधी हा निर्णय का घेतला याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत. या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता अन्य पक्षातून एक नेता येणार होता. त्यांनी येण्याचे आश्वासन दिले होते मात्र 'तो' नेता न आल्याने अचानक प्रफुल पटेलांना उमेदवारी दिली असल्याचे कारण पुढे आले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यसभेच्या या जागेसाठी पार्थ पवार, बाबा सिद्दिकी यांच्यासह 8-10 जण इच्छुक होते. त्यामुळे इतर कोणाला उमेदवारी देऊन, लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी नाराजीनाट्य नको, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने प्रफुल पटेल यांनाच उमेदवारी दिली असल्याचे समजते.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने वाद टाळण्यासाठी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीने हे सावध पाऊल टाकल्याचं सांगण्यात येत आहे. राज्यसभेच्या या जागेसाठी पार्थ पवार, बाबा सिद्दिकी यांच्यासह 8-10 इच्छुक उमेदवार होते. त्यामुळे इतर कोणाला उमेदवारी देऊन, लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी नाराजीनाट्य नको, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने प्रफुल पटेल (Prafful Patel) यांनाच उमेदवारी दिली असल्याची चर्चा आहे.